नवी दिल्ली, 25 मे 2021: नागपूर इथल्या राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल अकादमीत वरिष्ठ प्रशासकीय श्रेणीचे (SAG) एक संचालक पद निर्माण करायला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली. केन्द्रीय गृह मंत्रालयाने हा प्रस्ताव ठेवला होता.
एनडीआरएफ अकादमीत नवे संचालकपद निर्माण केल्यानंतर, संस्थेचा कार्यभार आणि नियंत्रण एका वरिष्ठ तसेच अनुभवी अधिकाऱ्यांकडे सोपवला जाईल. परिणामी संस्थेच्या नियोजित उद्दिष्टांची ते पूर्तता करु शकतील. अकादमी दरवर्षी एनडीआरएफ, एसडीआरएफ, सीडीच्या पाच हजार स्वयंसेवकांना कौशल्याधारित प्रशिक्षण देईल. यात इतर संबंधित संस्था आणि SAARC च्या आपत्ती प्रतिसाद संस्था तसेच इतर देशांचाही समावेश असेल.
संबंधित घटकांच्या बदलत्या गरजा आणि आवश्यकतेनुसार प्रशिक्षण कार्यक्रमाचे विश्लेषण आणि सुधारणेचेही काम केले जाईल. आपत्ती प्रतिसादाबाबत एनडीआरएफ, एसडीआरएफ कर्मचारी तसेच इतर संबंधित घटकांना दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाच्या गुणवत्तेत यामुळे प्रचंड सुधारणा होईल.
पार्श्वभूमी:-
राष्ट्रीय नागरी संरक्षण महाविद्यालयात (NCDC) विलीनीकरण करुन नागपूर इथे 2018 साली राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल अकादमीची स्थापना करण्यात आली. अकादमीचा मुख्य परिसर निर्माणाधीन असून सध्या NCDC च्या परिसरातूनच त्याचे कामकाज सुरु आहे. अकादमीतर्फे सध्या राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF)/राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF)/नागरी संरक्षण स्वयंसेवक आणि इतर संबंधित घटकांना प्रशिक्षण देत आहे. प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय प्रक्षिशण संस्थांच्या पंक्तीत ती बसू शकेल. SAARC आणि इतर देशांच्या आपत्ती प्रतिसाद कर्मचाऱ्यांना ही संस्था विशेष प्रशिक्षणही देईल.
More Stories
केंद्र सरकारच्या स्टार्टअप रँकिंग क्रमवारीत महाराष्ट्र ‘टॉप परफॉर्मर’
पंतप्रधानांनी आपल्या पुणे दौऱ्यात पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे केले उद्घाटन
पुणे येथील सिम्बॉयसिस विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन