पीवायसी फिल्ट्रम चॅलेंजर करंडक निमंत्रित 25 वर्षाखालील दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धेत पहिल्या डावात युनायटेड स्पोर्ट्स क्लबचे पीबीकेजेसीए संघापुढे 317धावाचे आव्हान

पुणे, दि. 13 डिसेंबर 2022 – पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित पीवायसी फिल्ट्रम चॅलेंजर करंडक निमंत्रित 25 वर्षाखालील गटाच्या दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत अभिषेक पवार(126धावा) याने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर युनायटेड स्पोर्ट्स क्लब संघाने पुनीत-बालन केदार जाधव क्रिकेट अकादमी संघापुढे पहिल्या डावात 317धावाचे आव्हान उभे केले. तर, शुभम मैड(5-31) याने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर क्लब ऑफ महाराष्ट्र संघाने पुना क्लब संघाला पहिल्या डावात 129धावात गुंडाळून वर्चस्व राखले.

डिझायर स्पोर्ट्स मैदानावरील सामन्यात प्रथम फलंदाजी करताना युनायटेड स्पोर्ट्स क्लब संघाने 88.5 षटकात सर्वबाद 317धावा केल्या. यात अभिषेक पवारने धडाकेबाज फलंदाजी करत 187 चेंडूत 15चौकार व 1 षटकारासह 126 धावांची शतकी खेळी केली. त्याला स्वप्नील वाळुंजने 68 धावा काढून साथ दिली. या दोघांनी सहाव्या गड्यासाठी 203चेंडूत 110 धावांची भागीदारी करून संघाच्या डावाला आकार दिला. पीबीकेजेसीएकडून गणेश मते(3-63), अक्षय चव्हाण(2-29), सिद्धार्थ म्हात्रे(2-29), शुभम वेलणकर(2-62) यांनी सुरेख गोलंदाजी केली. दोन्ही संघातील अजून एक दिवसाचा खेळ शिल्लक आहे.

पूना क्लब मैदानावरील लढतीत फिरकीपटू शुभम मैड(5-31), आदिल अन्सारी(3-17) यांनी केलेल्या शिस्तबद्ध गोलंदाजीच्या जोरावर पहिल्या डावात पुना क्लब संघाला 46.4 षटकात सर्वबाद 129धावावर रोखले. यात देव नवले 23, आर्यन गाडगीळ 24, नीरज मोरे 15, सागर मल्लपती 14 यांनी थोडासा प्रतिकार केला. याच्या उत्तरात क्लब ऑफ महाराष्ट्र संघाने आज दिवस अखेर 37 षटकात 8 बाद 126धावा केल्या. यात आदिल अन्सारी नाबाद 45 धावा, शुभम मैड नाबाद 6 धावांवर खेळत आहे, दोन्ही संघातील अजून एक दिवसाचा खेळ बाकी आहे.

डीव्हीसीए मैदानावरील सामन्यात पहिल्या डावात दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमीच्या अॅलन रॉड्रिग्स 3-18, मनोज यादव 2-36, ओंकार राजपूत 2-23, तिलक जाधव 2-6) यांच्या भेदक माऱ्यापुढे अँबिशियस क्रिकेट क्लबचा डाव 29.4 षटकात सर्वबाद 97 धावावर संपुष्टात आला. याच्या उत्तरात डीव्हीसीए संघाने आज दिवस अखेर 1.1षटकात 1बाद 6धावाकेल्या. यात यश जगदाळे नाबाद 5, तिलक जाधव नाबाद 0 धावांवर खेळत आहे.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
डिझायर स्पोर्ट्स मैदान: पहिला डाव: युनायटेड स्पोर्ट्स क्लब: 88.5 षटकात सर्वबाद 317धावा (अभिषेक पवार 126(187,15×4,1×6), स्वप्नील वाळुंज 68(143,5×4,1×6), निमीर जोशी नाबाद 31(34), आकाश जाधव 28, गणेश मते 3-63, अक्षय चव्हाण 2-29, सिद्धार्थ म्हात्रे 2-29, शुभम वेलणकर 2-62) वि.पीबीकेजेसीए : ;

पूना क्लब मैदान: पहिला डाव: पुना क्लब: 46.4 षटकात सर्वबाद 129धावा(देव नवले 23, आर्यन गाडगीळ 24, नीरज मोरे 15, सागर मल्लपती 14, शुभम मैड 5-31, आदिल अन्सारी 3-17) वि. क्लब ऑफ महाराष्ट्र : 37 षटकात 8 बाद 126धावा(आदिल अन्सारी नाबाद 45(59,2×4,3×6), यश क्षीरसागर 39(66,7×4), अखिलेश गवळे 3-34, राजकमल सिंग चौहान 2-28, हर्ष ओसवाल 2-25);

डीव्हीसीए मैदान: पहिला डाव: अँबिशियस क्रिकेट क्लब: 29.4 षटकात सर्वबाद 97 धावा(अनिकेत पोरवाल 27, नकुल काळे 13, तनेश जैन 11, अॅलन रॉड्रिग्स 3-18, मनोज यादव 2-36, ओंकार राजपूत 2-23, तिलक जाधव 2-6) वि.दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमी: 1.1षटकात 1बाद 6धावा(यश जगदाळे नाबाद 5, तिलक जाधव नाबाद 0, वैभव विभुते 1-2);

पीआयओसी मैदान: पहिला डाव: स्टार क्रिकेट अकादमी: 49 षटकात 7बाद 155धावा(शुभम हरपळे 44(61,5×4,2×6), शुभंकर हर्डीकर 34, निशांत नगरकर 25, सोहम लेले 23, तनय संघवी 19, दीपक डांगी 4-46, आयुष काबरा 1-23, आत्मा पोरे 1-24) वि.डेक्कन जिमखाना: