पुणे, दि.१३/०१/२०२३- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा १२२ व्या पदवीप्रदान समारंभासाठी पदवी प्रमाणपत्र प्राप्त करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी पदवी किंवा पदविका प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने केले आहे.
एप्रिल/मे २०२२ मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी विहित नमुन्यात ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे असे आवाहन परीक्षा प्रमाणपत्र विभागाकडून करण्यात आले आहे. यासाठी १६ जानेवारी ते १६ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत विद्यार्थी अर्ज करू शकतात. तर विलंब शुल्कासह अर्ज करण्याची मुदत ही १७ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी पर्यंत असणार आहे.
पदवी किंवा पदविका प्रमाणपत्र मिळविण्याकरिता विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज योग्य शुल्कासह भरल्यानंतर अंतिम वर्षाच्या गुणपत्रिकेची छायांकित प्रत अपलोड करणे आवश्यक आहे असेही प्रमाणपत्र विभागाकडून सांगण्यात आले आहे. याबाबतची सविस्तर माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील convocation.unipune.ac.in या लिंकवर उपलब्ध आहे.
More Stories
पीएमडीटीए-महाराष्ट्र मंडळ ब्राँझ सिरिज 2023 टेनिस स्पर्धेत नीरज जोर्वेकर, रणवीर गुंड, आयुष कौशल यांचा दुस-या फेरीत प्रवेश
पुणे: दौंडमधील सामूहिक हत्याकांड प्रकरणात आरोपींनी वापरलेली वाहने जप्त, सामुहिक हत्याकांड प्रकरणात आरोपींची चौकशी सुरू
22व्या एनइसीसी डेक्कन आयटीएफ 40000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत तात्जाना मारिया व निगिना अब्दुरैमोवा यांच्यात अंतिम लढत