विद्यापीठाचा ‘मीडिया अँड कम्युनिकेशन स्टडीज’ विभाग देशात चौथा ‘इंडिया टुडे’ मासिक: भारतातील ‘मास कम्युनिकेशन’ शिक्षण संस्थांचे सर्वेक्षण

पुणे,दि.२६- ‘इंडिया टुडे’ या मासिकाने भारतभरातील शैक्षणिक संस्थांचे सर्वेक्षण केले असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे ‘मीडिया अँड कम्युनिकेशन स्टडीज डिपार्टमेंट’ ‘मास कम्युनिकेशन कॉलेजेस’ च्या गटात देशात चौथ्या स्थानावर निवडले गेले आहे.

‘इंडिया टुडे’ मासिकातर्फे दरवर्षी भारतभरातील प्रत्येक शाखेमधील शिक्षणसंस्थांचे सर्वेक्षण करण्यात येते. त्यानुसार संबंधित विषयातील पहिल्या दहा दर्जेदार शिक्षण देणाऱ्या संस्थांची नावे जाहीर केली जातात. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे ‘मीडिया स्टडीज अँड कम्युनिकेशन डिपार्टमेंट’ २०१९ तसेच २०२० या दोन्ही वर्षांमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे.

कोरोना महामारीच्या काळात विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये यासाठी विभागाने ‘MS टीम प्रणाली’ आत्मसात करत अध्यापन, प्रात्यक्षिक परीक्षा, मूल्यांकन, प्रवेश प्रक्रिया कशा प्रकारे नव्याने उभारली व ‘विद्यार्थी शिक्षण’ केंद्रस्थानी ठेवून कशा प्रकारे परीक्षा घेण्यात आल्या यावरही या मासिकात प्रकाश टाकण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना या नव्या शिक्षण पध्दतीने शिकताना काय अनुभव आले हेही या सर्वेक्षणादरम्यान जाणून घेतले आहे.