पुण्यातील आगामी निवडणूका गिरीश बापटांचा नेतृत्वाखाली : चंद्रकांत पाटील

पुणे,१० जून २०२१ : पुण्यात भाजप चा कोणताही गट नसून, शहरातील आगामी निवडणुकांचे नेतृत्व हे खासदार गिरीश बापट यांच्याकडेच असणार, असे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

पाटील यांनी वाढदिवसानिमित्त पुण्यातील एका कार्यक्रमाच्या वेळी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पाटील यांनी शरद पवारांनी शिवसेनेचं कौतुक करणे म्हणजे ‘मजबूरी का नाम…’ असे आहे, असा टोला लगावला. अर्थात हे करताना प्रत्येक पक्षावर टीका टिप्पणी करणे योग्य नाही असेही ते राष्ट्रवादी बाबत बोलताना म्हणाले आहेत. पाटील म्हणाले, ” प्रत्येक पक्ष आपापल्या परीने आपली ताकद वाढवायचा प्रयत्न करत असतो. प्रत्येक पक्षावर आपण टीका टिप्पणी करणे योग्य नाही.”

चंद्रकांत पाटील यांनी वाढदिवशी आगामी निवडणूक ताकदीने लढवण्याचा संकल्प घेतला.