पुण्यात आज ६९ केंद्रांवर लसीकरण; ५४ ठिकाणी कोव्हीशील्ड, १५ ठिकाणी कोव्हॅक्सीन

पुणे, दि.२६ मे २०२१ महापालिकेकडे उपलब्ध असलेल्या लसीचे वितरण करण्याचे नियोजन करण्यात आले असून, उद्या (गुरुवारी) महापालिकेच्या ६९ केंद्रांवर लसीकरण होणार आहे.

महापालिकेला मंगळवारी (ता.२५) कोव्हीशील्डचे १९ हजार तर कोव्हॅक्सीनचे २ हजार ३०० डोस प्राप्त झाले होते. त्यानुसार आज शहरातील ११५ केंद्रांवर लसीकरण झाले आहे. यातून शिल्लक असलेली लस गुरुवारी नागरिकांसाठी उपलब्ध असले. कोव्हीशील्डची लस ५४ केंद्रांवर तर कोव्हॅन्सीची लस १५ केंद्रावर असणार आहे, प्रत्येक केंद्रावर १०० लसीचे डोस उपलब्ध आहेत.

– कोव्हीशील्डचा पहिला डोस घेऊन ८४ दिवसांपूर्वी (३ मार्च ) घेणाऱ्या नागरिकांना दुसरा डोस मिळेल.
– दुसऱ्या डोससाठी २० टक्के लस उपलब्ध
– पहिल्या डोससाठी आॅनलाइन बुकिंग करणाऱ्यांसाठी ६० टक्के डोस उपलब्ध
– आॅनलाइन बुकिंग गुरुवारी सकाळी ८ वाजता सुरू होईल. – पहिल्या डोससाठी थेट लसीकरण केंद्रांवर जाणारे आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन कर्मचारी व ४५ च्या पुढील नागरिकांसाठी २० टक्के डोस राखीव
– २९ एप्रिलपूर्वी पहिला डोस घेणाऱ्यांना कोव्हॅक्सीनचा दुसरा डोस दिला जाईल.