पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे आठ ठिकाणी लसीकरण; १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांचे होणार लसीकरण

पिंपरी, दि.०८|०५|२०२१: कोविड-१९ आजाराच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी व नागरिकांच्या संरक्षणासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. या उपाययोजनापैकी नागरिकांचे कोविड-१९ लसीरकण करणे हा महत्वाचा घटक आहे. लसीकरण वय गट १८ ते ४४ करिता ०८ लसीकरण केंद्रे खालील प्रमाणे-

१)नवीन भोसरी रुग्णालय – ४११०२६,
२)नवीन जिजामाता रुग्णालय-४११०१७,
३)प्रेमलोक पार्क दवाखाना-४११०३३,
४)यमुनानगर रुग्णालय-४११०४४,
५)डोळ्यांचे हॉस्पिटल –मासुळकर कॉलनी- ४११०१८,
६)पिंपळे ‍निलख पी.सी.एम.सी स्कुल-४११०२७,
७) नवीन आकुर्डी रुग्णालय – ४११०३५ व
८) आहिल्यादेवी होळकर स्कुल सांगवी-४११०२७

याकामी नागरीकांनी/लाभार्थ्यांनी www.cowin.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करुन Appointment घेणे बंधनकारक आहे. Appointment नसलेल्या नागरीकांचे लसीकरण करण्यात येणार नाही याची कृपया नोंद घेण्यात यावी. तसेच शासनाकडून लस साठा उपलब्ध न झाल्यामुळे दि.०८/०५/२०२१ रोजी वय वर्षे ४५ च्या वरील कोणत्याही नागरीकांचे लसीकरण करण्यात येणार नाही याची देखील नोंद घेण्यात यावी. या अनुषंगाने सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, फक्त नोंदणी करुन Appointment घेतलेल्या वय वर्षे १८ ते ४४ वर्षे वयोगटामधील लाभार्थ्यांनी वरील आठही लसीकरण केंद्राच्या ठिकाणी सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत उपस्थित रहावे, तसेच नोंदणी न झालेल्या नागरीकांनी लसीकरण केंद्राच्या परिसरामध्ये गर्दी करु नये व सहकार्य करावे.