पिंपरी चिंचवड येथील लसीकरण केंद्रावर शनिवारी 45 वर्षांपुढील नागरिकांचे लसीकरण

पिंपरी, दि. 21 मे 2021: शासनाने दिलेल्या लेखी मार्गदर्शक सुचनेनुसार शनिवारी ( दि.22) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रावर 45 वर्षांपुढील नागरिकांचे लसीकरण केले जाईल.

यावेळी ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या वयोगटामधील लाभार्थींना ‘कोविशिल्ड’ पहिला व दुसरा तसेच ‘कोव्हॅक्सिन’ चा दुसरा डोस खालील लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत देण्यात येईल.

ज्या लाभार्थ्यांनी पुर्वी ‘कोविशिल्ड’ या लसीचा पहिला डोस घेतला आहे त्यांना ‘कोविशिल्ड’ या लसीचा दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान म्हणजे (८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यत) देण्यात येणार आहे. तसेच ‘कोव्हॅक्सिन’ चा दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे.

वय वर्षे १८ ते ४४ वयोगटामधील लाभार्थींचे लसीकरण करण्यात येणार नाही, अशी माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी दिली.

अ.क्र. लसीकरण केंद्राचे नाव वयोगट कोविशिल्ड लस पहिला व दुसरा डोस लाभार्थी क्षमता
यमुनानगर रुग्णालय वय वर्षे ४५ पुढील १००
तालेरा रुग्णालय वय वर्षे ४५ पुढील १००
सावित्रीबाई फुले शाळा भोसरी वय वर्षे ४५ पुढील १००
नवीन जिजामाता रुग्णालय वय वर्षे ४५ पुढील १००
आचार्य अत्रे सभागृह वायसीएम रुग्णालय जवळ वय वर्षे ४५ पुढील १००
खिंवसरा पाटील रुग्णालय थेरगाव वय वर्षे ४५ पुढील १००
नवीन आकुर्डी रुग्णालय वय वर्षे ४५ पुढील १००
कासारवाडी दवाखाना वय वर्षे ४५ पुढील १००