शहरात कोव्हॅक्सीनचे १५ ठिकाणी लसीकरण

पुणे, ता. ३० मे २०२१: महापालिकेतर्फे सोमवारी (ता. ३१) शहरात १५ ठिकाणी कोव्हॅक्सीनच्या दुसऱ्या डोससाठी लसीकरण केले जाणार आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिले आहे.

महापालिकेकडे शासनाकडून आलेले कोव्हीशील्डचे पाच हजार डोस संपले आहेत, नव्याने लस पुरवठा झालेला नसल्याने सोमवारी कोव्हीशील्डचे केंद्र बंद असणार आहेत. केवळ १५ ठिकाणी कोव्हॅक्सीनचे लसकरण केले जाणार आहे. प्रत्येक केंद्रावर १०० लसीचे डोस उपलब्ध आहेत. ३ मे पूर्वी पहिला डोस घेतलेले नागरिक यासाठी पात्र असतील.

महापालिकेने रविवारी शहरात ५७ ठिकाणी कोव्हीशील्ड व १५ ठिकाणी कोव्हॅक्सीन लसीकरण केले. खासगी रुग्णालयांमध्येही १८ च्या पुढील वयोगटाचे लसीकरण सुरू झाले. आज महापालिका व खासगी दवाखान्यात एकूण १५ हजार ६३४ जणांचे लसीकरण झाले आहे.