पुण्यात परदेशी शिक्षणासाठी जाण्याऱ्या विद्यार्थ्यांसाठी लसीकरण सुरू

पुणे, ३१ मे २०२१: पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे कोरोना लसीकरणाचा प्रथम डोस (कोव्हिशिल्ड) देण्याचा निर्णय पुणे मनपाने घेतला असून, विद्यार्थ्यांना परदेशात जाण्यासाठी कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयातील ५ व्या मजल्यावर स्थापित लसीकरण केंद्रावर मंगळवार दि.०१ जून २०२१ रोजी व बुधवार दि.०२ जून २०२१ रोजी असे दोन दिवस सकाळी १० ते ५ या वेळेत हा विशेष मोहीम राबविणार असून नोंदणी न करता थेट टोकन पध्दतीने परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण केले जाणार आहे.

त्यासाठी पुण्यातील रहिवासी असलेल्या तसेच उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यक वैध पुराव्यानीशी, म्हणजे परदेशी विद्यापीठ प्रवेश मिळाल्याचे निश्चितीपत्र, परदेशी व्हिसा, व्हिसा मिळण्यासाठी संबंधित विद्यापीठाकडून प्राप्त झालेले 120 किंवा DS 160 From (Admission Confirmation letter and I-20 or DS-160 From for Foreign Visa from Concerned overseas university etc.) इत्यादी कागदपत्रे असल्यास studentvaccination.pune@gmail.com ती सदर ईमेल वर आगोदर पाठविण्यात यावीत, तसेच पुणे मनपा प्रशासनाकडून आपल्याला देण्यात येणाऱ्या विहित वेळी संबंधितानी लसीकरणासाठी उपरोक्त ठिकाणी येण्यास सांगितले आहे.