कोल्हापूर, 10 नोव्हेंबर 2025: महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए) आणि कोल्हापूर जिल्हा लॉन टेनिस संघटना(केडीएलटीए) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 20व्या रमेश देसाई मेमोरियल नॅशनल ज्युनियर राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत पहिल्या फेरीत मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या बिगर मानांकित वरद पोळने राजस्थानच्या सातव्या मानांकित अपूर्व जैनचा 6-3, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव करून आजचा दिवस गाजवला.
कोल्हापूर येथील केडीएलटीए टेनिस संकुलात सुरू असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉ मध्ये पहिल्या फेरीत मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या नील केळकरने विवान मल्होत्राचा 7-5, 6-1 असा तर, चौथ्या मानांकित शिवतेज शिरफुलेने तमिळनाडूच्या अश्विन काबिलनचा 6-2, 6-2 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली.
पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या महाराष्ट्राच्या
शिवराज जाधवने गुजरातच्या माधव शहाचा 6-0, 6-0 असा एकतर्फी पराभव केला. आठव्या मानांकित महाराष्ट्राच्या सक्षम भन्साळी याने तमिळनाडूच्या नरेश प्रभूचे आव्हान 6-2, 7-6(3) असे मोडीत काढले. महाराष्ट्राच्या वरद उंद्रेने कर्नाटकच्या सिद्धांत वोडेयारवर 6-0, 6-3 असा विजय मिळवला.
निकाल: मुख्य ड्रॉ: पहिली फेरी: मुले:
रिभव सारोहा(1)(चंदीगढ) वि.वि.दक्ष पाटील(महाराष्ट्र) 7-6(4), 6-3;
मोक्षग्न तलशिला (तेलंगणा)वि.वि.ध्येय शांडिल्य(महाराष्ट्र)6-4, 2-6, 6-4;
नमिश हूड(महाराष्ट्र) वि.वि.पुनीत एम(कर्नाटक) 6-2, 7-5;
लक्ष्य डराल(14)(दिल्ली) वि.वि.सौमित्र किर्दत(महाराष्ट्र) 6-3, 6-2;
संकल्प सहानी(11)(पश्चिम बंगाल)वि.वि.शार्दुल खवले(महाराष्ट्र)1-6, 6-2, 6-3;
आरव पटेल (महाराष्ट्र)वि.वि.अयान सिंग(तेलंगणा) 7-5, 6-1;
नील केळकर(महाराष्ट्र)वि.वि.विवान मल्होत्रा 7-5, 6-1;
वरद पोळ(महाराष्ट्र)वि.वि.अपूर्व जैन(7)(राजस्थान)6-3, 6-2;
शिवतेज शिरफुले(4)(महाराष्ट्र) वि.वि.अश्विन काबिलन(तामिळनाडू) 6-2, 6-2;
अर्जुन मणिकंदन(कर्नाटक)वि.वि.नील भारद्वाज(राजस्थान) 7-5, 6-3;
हेमदेव महेश(तामिळनाडू) वि.वि.अर्जुन शर्मा(उत्तर प्रदेश) 6-3, 6-1;
इशाय्यू देसाई(15)(कर्नाटक) वि.वि.नीव गोगिया(महाराष्ट्र)7-6(5), 3-6, 6-3;
अर्णव खंडेलवाल(मध्यप्रदेश) वि.वि.सुजय पोथुला(तेलंगणा) 6-4, 7-5;
शिवराज जाधव(महाराष्ट्र) वि.वि.माधव शहा(गुजरात) 6-0, 6-0;
सक्षम भन्साळी(8)(महाराष्ट्र) वि.वि.नरेश प्रभू(तामिळनाडू) 6-2, 7-6(3);
वरद उंद्रे(महाराष्ट्र) वि.वि.सिद्धांत वोडेयार(कर्नाटक) 6-0, 6-3;
साई कानिथी(16)(आंध्रप्रदेश) वि.वि.फ्रँकलिन रिचर्डसन(तामिळनाडू)6-2, 6-1.

More Stories
44 व्या पीएसपीबी आंतर युनिट लॉन टेनिस स्पर्धेत दिविज शरण, प्रतीक शेरॉन, अपूर्व जैसवाल, प्रार्थना ठोंबरे, सोहिनी मोहंती यांची विजयी सुरुवात
44 व्या पीएसपीबी आंतर युनिट लॉन टेनिस स्पर्धेचे आयोजन
आयएफएससी आशियाई किड्स चॅम्पियनशिप 2025: कोरियाचे 18 पदकांसह वर्चस्व, तर भारतीय खेळाडूंची सात पदकांसह दमदार कामगिरी