ईएमएमटीसी 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत वेदांत पवार, बानू अश्विन यांचे संघर्षपूर्ण विजय

औंरंगाबाद, दि 12 नोव्हेंबर 2022: ईएमएमटीसी तर्फे आयोजित व एआयटीए व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली  ईएमएमटीसी 14 वर्षाखालील राष्ट्रीय  टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत पहिल्या पात्रता फेरीत वेदांत पवार, पार्थ कुलकर्णी, वरद उंद्रे, बानू अश्विन, सृष्टी सूर्यवंशी या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून पात्रता फेरीच्या दुसऱ्या चरणात प्रवेश केला.

ईएमएमटीसी टेनिस कॉम्प्लेक्स औंरंगाबाद येथे  आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत  पहिल्या पात्रता फेरीत मुलांच्या गटात वेदांत पवारने सार्थक धुमाळचा  9-8(3) असा संघर्षपुर्ण लढतीत पराभव करत स्पर्धेत आगेकूच केली. व्हिन्सेंट कोरिटेपतीने अरमान दुआचा 9-4 असा तर यश कुमारने विश्वजीत चौधरीचा 9-0 असा पराभव केला.

मुलींच्या गटात बानू अश्विन हिने संयुक्ता पगारेचा 9-8(4) असा तर सृष्टी सूर्यवंशीने  रित्सा कोंडकरचा  9-7 असा अतीतटीच्या लढतीत पराभव करत दुस-या पात्रता फेरीत प्रवेश केला. त्रिशा अर्बडेने गार्गी मारूचा 9-5 असा तर पृथा रावने  विपश्यना सोनवणेचा 9-0 असा पराभव केला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: पहिली पात्रता फेरी: मुले:

देशम शंकर (उत्तर प्रदेश) वि.वि अर्णव चौधरी (तमिळनाडू) 9-1

पार्थ कुलकर्णी (महाराष्ट्र) वि.वि विराट बदाना (तेलंगणा) 9-7

स्मित उंद्रे (महाराष्ट्र) वि.वि शरण सोमासी (कार्नाटक) 9-6

व्हिन्सेंट कोरिटेपती (आध्र प्रदेश) वि.वि अरमान दुआ (दिल्ली) 9-4

यश कुमार वि.वि विश्वजीत चौधरी (महाराष्ट्र) 9-0

वरद उंद्रे (महाराष्ट्र) वि.वि आरव पटेल (महाराष्ट्र) 9-5

ऋषिकेश माने (महाराष्ट्र) वि.वि निरव पोटपेल्लीवार 9-1

वेदांत पवार (महाराष्ट्र) वि.वि सार्थक धुमाळ (महाराष्ट्र) 9-8(3)

सूर्या काकडे (महाराष्ट्र) वि.वि जय गायकवाड (महाराष्ट्र) 9-2

रोहन बजाज (महाराष्ट्र) वि.वि अभिनव महामुनी (महाराष्ट्र) 9-2

आरुष जोशी (महाराष्ट्र) वि.वि त्रिशिक वाकळकर (महाराष्ट्र) 9-5

क्रिश बोरसे (महाराष्ट्र) वि.वि राजन वरधमणी (कर्नाटक) 9-0

वेदांत कुलकर्णी (महाराष्ट्र) वि.वि आरव गुप्ता (उत्तर प्रदेश) 9-4

तरुण एच (कर्नाटक) वि.वि आदित्य योगी 9-3

मुली:

बानू अश्विन (तमिळनाडू) वि.वि संयुक्ता पगारे (महाराष्ट्र) 9-8(4)

सृष्टी सूर्यवंशी (महाराष्ट्र) वि.वि रित्सा कोंडकर (महाराष्ट्र) 9-7

त्रिशा अर्बडे (महाराष्ट्र) वि.वि गार्गी मारू (महाराष्ट्र) 9-5

पृथा राव (कर्नाटक) वि.वि विपश्यना सोनवणे (महाराष्ट्र) 9-0