पुणे, ३ ऑगस्ट २०२४ ः ही जी निवडणूक आहे, ही निवडणूक सोपी नाही उद्धवजी. तुम्ही आम्हाला नेहमी सांगता, ते आम्ही खाली कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना सांगतो. नुसती हवा निर्माण करून चालणार नाही. लोकसभेच्या निवडणुका आपण ताकदीने लढलो आणि जिंकलो. तरी शिवसेने जे यश अपेक्षित केलेलं होतं ते आपल्या वाट्याला येऊ शकलं नाही. आपण कष्ट केले. नवीन पक्ष, नवीन चिन्ह, समोर पैशाची ताकद, दहशतवाद या सगळ्या गोष्टीला आपण पुरून उरलो आणि आपण लढलो. विधानसभेची लढाई ही त्यापेक्षा तुंबळ होणार आहे. विधानसभेची लढाई ही आरपारची लढाई होणार आहे. आणि जे आपण म्हणालात एक तर तूर राहशील किंवा मी राहीन… राहणार आपणच, हे जरी खरं असलं तरी राहण्यासाठी प्रत्येकाला छातीला कोट करून यावेळी लढावं लागेल, असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांनी केले.
पुण्यातील शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिवसंकल्प मेळाव्यात शिवसेनेची मुलुखमैदानी तोफ धडाडली.
संजय राऊत म्हणाले, सकाळपासून आजचं वातावरण पाहिलं तर खूप दिवसांनी पुण्यामध्ये अशा प्रकारचं वातावरण निर्माण झालेलं आहे. कोणत्या जागा लढायच्या आहेत? काय करायचं आहे? याची यादी तयार आहे. पुणे, मावळ अन् पुणे जिल्ह्यातील प्रत्येक जागा लढवण्याची ताकद शिवसेनेत आहे. गेल्या 25-30 वर्षात या प्रत्येक जागेवर कधीना कधी शिवसेनेचा आमदार जिंकून आलेला आहे. तुम्ही एक-दोन जागा घेऊ नका. गेल्या काही वर्षात शिवसैनिकांनी दुसऱ्यांच्या पालख्या खूप वाहिल्या. आता शिवसैनिकांनी स्वतःच्या पालख्या वाहायच्या आहेत. कधी भाजपची पालखी वाहिली, त्यांचे आमदार निवडून आणले. कसब्याची निवडणूक झाली. शिवसैनिकांनी कष्ट करून कसब्याचा आमदार निवडून आणला. सुप्रियाताई सुळे यांचा बारामतीत विजय करण्यासाठी शिवसैनिकांनी अक्षरशः रान पेटवलं. पुण्यात लोकसभा निवडणुकीत शिवसैनिकांनी प्रचंड काम केलं. पण आता उद्याच्या विधानसभेत शिवसैनिकांनी स्वतःकडे आपल्याकडे पाहिलं पाहिजे. आपण महाविकास आघाडीत जरी असलो तरी आता पहिली पसंती शिवसेना आणि माननीय उद्धव ठाकरे, हे आपल्याला करावं लागेल आणि यासाठी हा शिवसंकल्प मेळावा आहे, असे शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले.
‘विधानसभेची लढाई ही आरपारची लढाई’
शिवसंकल्प मेळाव्यातून आपल्याला काय संदेश मिळणार आहे, हे माननीय उद्धवसाहेब सांगतील. पण दोन दिवसांपूर्वी माननीय उद्धवजींनी या महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांना जो मंत्र दिलेला आहे, संदेश दिलेला आहे, तो घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. एक तर तू राहशील किंवा मी. एक तो तू रहेगा या मै रहूंगा लेकीन महाराष्ट्र मे रहेगी शिवसेना… तुम्हारे जैसे कुत्ते सिर्फ भोकते है… हे सांगा त्यांना. हम शेर है खुलेआम ठोकते है. एक तो तू रहेगा नही तो मै रहूंगा हे सांगणारा या देशात महाराष्ट्रात जर कोणी असेल तर तो माझा नेता माननीय उद्धव ठाकरे आहे, माझ्या नादाला लागू नका, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.
विधानसभेला गाफिल राहू नका’
लोकसभेच्या काही जागांचा निकाल पाहिला तर अनेक ठिकाणी आपण महाराष्ट्रात आणि देशात गाफिल राहिलो. नाही तर मोदी तो गयो इथून, काल एक रिपोर्ट आलेला. भाजपचे लोक किंवा हे चोरांचे सरकार किती बारीक पद्धतीने काम करतात हे दिसतं. एडीआर ही एक संस्था आहे. या संस्थेचा एक रिपोर्ट आला आहे. त्यांचा रिपोर्ट अत्यंत ऑथेंटीक मानला जातो. निवडणुका झाल्यावर देशातल्या सर्व मतदारसंघांचा ते अभ्यास करतात आणि ते त्यांचा एक अहवाल देतात. देशातल्या एकूण 538 लोकसभा मतदारसंघात हेराफेरी झालेली आहे. प्रत्यक्ष झालेलं मतदान आणि मोजलेली मतं यांच्या तफावत आहे, हे या संस्थेला आढळून आलं. ३६२ मतदारसंघात झालेले मतदानाचे जे आकडे आहेत त्या पेक्षा किमान साडेसहा लाख मतं कमी दिसताहेत. १७६ मतदारसंघात २ लाख मतं जास्त मोजली गेली आहेत. हा आकडा फार कमी दिसतोय. पण या महाराष्ट्रात ४ मतदारसंघ असे आहे जे आपण फार कमी मतांनी हरलेलो आहोत. ५० पासून ते १२ हजार ते १५ हजारापर्यंत मतांनी हरलो. मुंबईतील जागा ४८ मतांनी हरलोय. हातकणंगलेची जागा आपण १२ हजार मतांनी हरलोय. बुलडाण्याची जागा आपण अत्यंत कमी मतांनी हरलोय. हे कमी मोजले आणि जास्त निघाले. त्यानंतर उत्तर प्रदेशातील ९ मतदारसंघात १०० ते १ हजार मतांनी भाजपचा विजय झालेला आहे. बिहारमध्येही याच पद्धतीने झालेलं आहे. आणि या सगळ्यांच्या मतांचा आकडा मोजला तर तो सात लाख आहे. जिथे आपलं लक्ष नव्हतं, मतदान केंद्रावरील लोकांनी जरासा गाफिलपणा दाखवला आणि त्यामुळे अशा प्रकारे ते विजय चोरू शकले, आपल्याकडून सगळे हिसकावून घेतले. नाही तर भारतीय जनता पक्षाचा पराभव झालेलाच होता. आणि अशा प्रकारचे देशातील ३४ ते ४० मतदारसंघ असे होते जिथे पाच ते सहा लाख चोरलेली मतं आहेत, तिथे त्यांनी शेवटच्या क्षणी विजय मिळवलेला आहे. अशा प्रकारचे उद्योगधंदे हे विधानसभेत अधिक मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. जे आपल्या नेत्यांचं आणि सहकाऱ्याचं मार्गदर्शन ऐकलंय. त्या मार्गदर्शनासोबतच जिथे आहात त्या जमिनीवर एखाद्या योद्धयाप्रमाणे शेवटच्या मिनिटापर्यंत तुम्ही उपस्थित राहिलं पाहिजे. प्रत्येक मताची मोजणी होईपर्यंत तुम्ही उपस्थित राहिलं पाहिजे. तसं झालं नाही तर आज जे आकडे आलेले आहेत आणि त्यात किमान 35 ते 40 जागा आपल्या हातून निसटलेल्या आहेत, त्यात शिवसेनेच्या ४ चार जागा आहेत. त्या चार जागा आपल्या हातात आल्या असत्या तर आपण १४-१५ जागा जिंकून महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर असतो. विधानसभेत अशा प्रकारचा गाफिलपणा आपल्याकडे असता कामा नये, असा सावधानतेचा संजय राऊत यांनी दिला.
शिवसेनेला निवडणुका नवीन नाही. आपण अनेक जय पाहिले, अनेक पराभव पचवलेत. त्यातून आपण उभे राहिलो. हिंदुहृदयस्रमाट बाळासाहेब ठाकरे असताना आणि त्यांच्यानंतर उद्धवजी असताना अनेक वार आपण छातीवर आणि पाठीवरही झेलले आहेत. माझ्या पाठीवर इतके वार झालेत, इतके घाव झाले आता नवीन घाव झेलण्यासाठी माझ्या पाठीवर जागा राहिलेली नाही, असे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. या सगळ्या प्रसंगातून आपण इथपर्यंत आलोय. इथपर्यंत येत असताना उद्धवजींच्या नेतृत्वात जी लढाई जो संघर्ष करत आलोय, तो संघर्ष करणं सोपं नव्हतं. उद्धवजी काल जे म्हणाले तो त्यांचा त्रागा होता. माझ्या काळजात गेलेला तो शब्द आहे. एक तर तू राहशील किंवा मी राहीन. आणि हीच आपली टॅग लाईन आहे निवडणुका जिंकाण्याची हे सर्वांनी लक्षात घ्यावं. आपल्या नेत्याच्या तोंडातून निघालेला हा विजयाचा मंत्र आहे लढण्याची ताकद, ही तलवार आहे. उद्याच्या निवडणुकीत आपल्याला जिंकायचं असेल, महाराष्ट्र काबीज करायचा असेल तर एक तर तू राहशील किंवा मी राहीन, या जिद्दीने आपण मैदानात, या रणांगणात उतरायला पाहिजे. तू जाशील आणि मीच राहीन, ही जिद्द पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर हा महाराष्ट्र कोणावर प्रेम करत असेल श्रद्धा ठेवत असेल तर तो हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आणि त्यांची शिवसेना आहे. एकनाथ शिंदे यांच्यासारख्या चोर लफंग्यांना अशी सहज चोरता येणार नाही, असा वज्राघात संजय राऊत यांनी केला.
‘औरंगजेबाप्रमाणे भाजपची कबरही या महाराष्ट्रातच खणायची’
पुण्याच्या या भूमित जे शिबिर आपण घेतोय, ती पवित्र भूमी आहे. या भूमिचं महत्त्व आहे, इथून सुरुवात होतेय. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचा सोन्याचा नांगर या मातीत लावला आणि महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्याचं पिक काढलं. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या फॅन्स क्लबचे मेंबर आहोत औरंगजेबाचे नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज इथे जन्माला आले, औरंगजेब गुजरातला जन्मला, हे मी वारंवार सांगतो. औरंगजेबची भाषा गुजराती होती, शिवाजी महाराजांची भाषा मराठी होती. औरंगजेबाचे व्यवहार उर्दू बरोबर गुजरातीतून चालत होतो. जी औरंगजेबाची वृत्ती आहे ती भारतीय जनता पक्षाची वृत्ती आहे. तुम्ही औरंगजेबची अवलाद आहात, हे उद्धवजी का म्हणतात? कारण औरंगजेब हा दिल्लीतून महाराष्ट्रात आला, गुजरातला गेला अख्खा देश फिरत राहिला. राज्य काबीज करत राहिला, देवळं, मंदिरं तोडत होता. औरंगजेबाला पाचशे बायका होता. त्यात त्याच्या काही पट्टराण्या होत्या. औरंगजेबाला फावल्या वेळात टोप्या विणण्याचा छंद होता. मोदींनाही असे खूप छंद आहेत, धार्मिक… ते तपस्येला बसतात. औरंगजेबही ध्यान करत होता, जपमाळ ओढत होता. त्याचे फोटोही आहेत. विणलेल्या टोप्या तो अनाथ अश्रमात वाटत होता. औरंगजेबाच्या राणीने त्याला विचारलं जहापना, तुम्हाला नक्की काय करायचं काय मिळवायचं आहे? आता मी महाराष्ट्रावर स्वारी करणार, महाराष्ट्र काबीज केला की दक्षिणेकडे जाणार. अशा तन्हेने संपूर्ण राज्य, देश काबीज केला की या देशाच्या आजूबाजूचे इराण, अफगाणिस्तान वैगरे हे सुद्धा भाग ताब्यात घेणार आणि मग जागाचा राजा झाल्यावर शांतपणे जगायला सुरुवात करीन, असं औरंगजेबाने राणीला सांगितलं. तुम्ही आताचा निवांतपणे का जगत नाही? इतकं सगळं असताना. हा निवांतपणा तुम्हाला कधी मिळेल? असं राणी त्याला म्हणाली. औरंगजेबाच्या आयुष्यात तो निवांतपणा आला नाही आणि या महाराष्ट्रात त्याची कबर खणली गेली आणि या भारतीय जनता पक्षाची कबर सुद्धा औरंगजेबाप्रमाणे या महाराष्ट्रातच खणण्याचं राष्ट्रकार्य इथे आपल्याला करावं लागणार आहे, असे संजय राऊत म्हणाले.

More Stories
Pune: मला कुठलीही राजकीय किंमत मोजावी लागली तरी मोजायला मी तयार – माजी आमदार रवींद्र धंगेकर
HND जैन बोर्डिंगचे विश्वस्त श्री जयंत नांदुरकर यांना आचार्य श्री गुप्ती नंदीजी यांनी खडेबोल सुनवत खरेदी व्यवहार रद्द करण्यास सांगितले
Pune: जैन बोर्डिंग प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, मुख्यमंत्र्यांनी जैन बोर्डिंगसाठी १०० कोटी जाहीर करावे – धंगेकर