पुणे, 16 डिसेंबर 2022: ओम दळवी मेमोरियल ट्रस्ट यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या विजयेंद्र कुलकर्णी मेमोरियल चॅम्पियनशीप सिरीज 16 वर्षांखालील राष्ट्रीय मानांकन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत देशभरातून 120 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. हि स्पर्धा महाराष्ट्र पोलीस जिमखाना, औंध या ठिकाणी 17 ते 23 डिसेंबर 2022 या कालावधीत होणार आहे.
स्पर्धा संचालक मारुती राऊत यांनी सांगितले की, स्पर्धेत अहमदाबाद, मुंबई, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सातारा या ठिकाणांहून खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. स्पर्धेतील विजेत्यांना करंडक व प्रशस्तीपत्रक व गुण देण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी प्रविण झिटे यांची स्पर्धा निरीक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे.
More Stories
पुणे विद्यापीठाचे ३० जानेवारीचे पेपर ५ फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार
पीएमडीटीए-महाराष्ट्र मंडळ ब्राँझ सिरिज 2023 टेनिस स्पर्धेत नीरज जोर्वेकर, रणवीर गुंड, आयुष कौशल यांचा दुस-या फेरीत प्रवेश
पुणे: दौंडमधील सामूहिक हत्याकांड प्रकरणात आरोपींनी वापरलेली वाहने जप्त, सामुहिक हत्याकांड प्रकरणात आरोपींची चौकशी सुरू