येरवडा: आज दिनांक 16/01/2024 रोजी महाराष्ट्र कारागृह विभागातील अधिकारी /कर्मचारी यांच्या प्रशिक्षणासाठी तुरूंग अधिकारी प्रशिक्षण महाविद्यालय, येरवडा, पुणे येथे अमिताभ गुप्ता, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा ,महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते Virtual Classroom व Modern Computer Lab चे उद्घाटन करण्यात आले. सदरील Virtual Classroom व Modern Computer Lab च्या उभारणीसाठी फिनोलेक्स इंडस्ट्रीज लि. यांच्याकडील CSR मधून वित्तीय साह्य प्राप्त झाले आहे.
सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वच काम संगणकीकरण प्रणालीद्वारे होण्यावर जास्त भर आहे. त्याकरीता महाराष्ट्र कारागृह विभागामध्ये सुध्दा बंद्यांसाठी ePrisons (ICJS) प्रणाली राबविण्यात आलेली आहे. तसेच eOffice प्रणाली राबविण्याची कार्यवाही सुरू आहे. प्रशिक्षणासाठी eLearning, Virtual Classroom व eLibrary इत्यादी नवनविन संकल्पना राबविणे सुरू आहे. त्याकरीता मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ प्रशिक्षीत करणे गरजेचे आहे. तुरूंग अधिकारी प्रशिक्षण महाविद्यालय येथे प्रशिक्षणासाठी अतिशय तुटपुंजी व्यवस्था होती. त्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे व एका वेळी ५० अधिकारी/कर्मचारी प्रशिक्षण घेऊ शकतील अशी Modern Computer Lab तयार करण्यात आलेली आहे. तसेच तज्ज्ञ प्रशिक्षक प्रशिक्षण संस्थेतून राज्यातील विविध जिल्ह्यातील कारागृह अधिकारी/कर्मचारी यांना Virtual Classroom द्वारे त्या विषयासंबंधी प्रशिक्षण देऊ शकणार आहेत. सदर Virtual Classroom व Modern Computer Lab चे प्रशिक्षक म्हणून श्रीमती प्रणिता परळीकर व श्री विजय भिसे हे काम पाहणार आहेत.
यावेळी अमिताभ गुप्ता म्हणाले, “महाराष्ट्र कारागृह विभागासाठी नव्याने २००० पदे निर्माण करण्यात आलेली आहेत. तसेच विविध २५५ पदांसाठी भरती प्रक्रीया सुरू आहे. त्यामुळे लवकरच मोठ्या प्रमाणात प्रशिक्षीत मनुष्यबळ कारागृह विभागासाठी उपलब्ध होईल व सध्या अधिकारी/कर्मचारी यांच्यावर अतिरिक्त कामाचा जो ताण येत आहे तो बऱ्याच प्रमाणात कमी होईल. त्यामुळे अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी मार्गी लागतील. तसेच कारागृह सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट होईल.”
कारागृह अधिकारी/कर्मचारी यांना देखील आधुनिकीकरणाशी परिचीत होऊन आधुनिकीकरण व माहिती तंत्रज्ञान संबंधी उपकरणांचा प्रभावीपणे वापर करता येण्यासाठी त्यांच्यामध्ये आवश्यक ते कौशल्ये निर्माण होणे गरजेचे आहे. या मुलभूत विचारातून अमिताभ गुप्ता, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधार सेवा, महाराष्ट्र राज्य यांनी राज्यस्तरीय इतर नामांकित प्रशिक्षण संस्था, जसे, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), पुणे, महाराष्ट्र पोलीस अकॅडमी, नाशिक, महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी, पुणे यांच्या प्रमाणे दौलतराव जाधव तुरुंग अधिकारी प्रशिक्षण महाविद्यालय, येरवडा, पुणे येथे महाराष्ट्र कारागृह विभातील अधिकारी व कर्मचारी यांच्याकरीता ई-लर्निंग, ई-लायब्ररी, व्हर्च्युअल क्लासरूम, अद्ययावत Computer Lab इत्यादी सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतलेला असून त्यापैकी अद्ययावत Virtual Classroom व Computer Lab आजपासून कार्यान्वित करण्यात आलेली आहे. सदर कामांसाठी मुकुल माधव फाऊंडेशन व फिनोलेक्स इंडस्ट्रीज यांनी CSR फंडातून आर्थिक मदत केलेली आहे. याकामी डॉ जालिंदर सुपेकर, विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह मुख्यालय) यांनी मुख्यालय स्तरावरून मुकुल माधव फाऊंडेशन व फिनोलेक्स इंडस्ट्रीज लि. यांच्याशी समन्वय ठेऊन सदर काम वेळेत पुर्ण करून घेण्यासाठी महत्त्वपुर्ण योगदान दिलेले आहे.
यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह मुख्यालय) डॉ जालिंदर सुपेकर, कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे, अधीक्षक येरवडा मध्यवर्ती कारागृह सुनील ढमाळ, प्राचार्य दौलतराव जाधव तुरुंग अधिकारी प्रशिक्षण महाविद्यालय, पुणे – नितीन वायचळ, मॅनेजिंग ट्रस्टी, मुकुल माधव फाऊंडेशन व CSR चेअरमन, फिनोलेक्स इंडस्ट्रीज रितु प्रकाश छाब्रिया, फिनोलेक्स पाईपचे निवृत्त एमडी अनिल बाबी, मुकुल माधव फाऊंडेशन, सीएसआर एक्झेक्युटिव्ह मोकाले बबलु इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
More Stories
Pune: मुळा-मुठेला प्रदूषणातून सुटका? मंजूर झाला तब्बल ८४२ कोटींचा मेगा प्लॅन
Pune: वसतिगृह स्थलांतरामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय
Pune: पीएमआरडीएतील सेवा सुविधा नागरिकांसाठी ऑनलाईन