विश्रामबाग पोलिसांकडून सराईत रिक्षाचोराला अटक, ३ लाख ८५ हजारांच्या चार रिक्षा जप्त

पुणे, दि.२० मे २०२१:  शहरातील विविध भागात रस्त्यावर उभ्या असलेल्या रिक्षा चोरून नेणाNया सराईताला विश्रामबाग पोलिसांनी अटक केले. त्याच्याकडून ३ लाख ८५ हजार रूपये विंâमतीच्या चार रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. अशोक उर्पâ संतोष चंद्रकांत ढेरे (वय ४६, रा. वाघोली, मूळ- करपडी, नगर)  असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी संतोष दत्तात्रय जगताप (वय ३२) यांनी तक्रार दिली आहे.

विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतून संतोष जगताप यांची रिक्षा चोरून नेण्यात आली होती. त्यानुसार पोलिस तपास करीत असताना, रिक्षा चोरून नेणारा संशयित आरोपी रामेश्वर चौकात आल्याची माहिती पोलीस अमंलदार सात्ताप्पा पाटील यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून अशोक ढेरे याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने रिक्षा चोरल्याची कबुली दिली. त्याने बंडगार्डन, कोथरूड, विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरून नेलेल्या ४ रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. ही कामगिरी पोलीस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय टिकोळे, पोलीस निरीक्षक वुंâडलीक कायगुडे, पोलीस उपनिरीक्षक राकेश सरडे, गणेश मोकाशी, संजय दगडे, बाबासाहेब  दांगडे, धीरज पवार,  विठ्ठल खिलारे, हेमंत पालांडे, प्रशांत शिंदे, सात्ताप्पा पाटील, अभिजीत गोंजारी यांच्या पथकाने केली आहे.