एमएसएलटीए ओम दळवी मेमोरियल एआयटीए 12वर्षाखालील चॅम्पियनशीप सिरीज टेनिस स्पर्धेत विश्वास चंद्रशेखर, कियान पटेल यांचा मानांकित खेळाडूंवर सनसनाटी विजय

पुणे, 28 नोव्हेंबर, 2022: ओम दळवी मेमोरियल ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित एमएसएलटीए ओम दळवी मेमोरियल एआयटीए 12 वर्षाखालील चॅम्पियनशीप सिरीज टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात क्वालिफायर विश्वास चंद्रशेखर, कियान पटेल या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंवर विजय मिळवत आजचा दिवस गाजवला.

महाराष्ट्र पोलीस टेनिस कोर्ट, औंध येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात पहिल्या फेरीत पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या विश्वास चंद्रशेखर याने सातव्या मानांकित अवि मिश्राचा 6-3, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. कियान पटेल याने चौथ्या मानांकित आरव बेलेचा 6-2, 0-6, 6-4 असा तीन सेटमध्ये पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला. अंशुल पुजारीने शुभ नाहाटाचा 6-0, 7-5 असा तर, तिसऱ्या मानांकित सर्वज्ञ सरोदेने राघव अग्रवालचा 6-0, 6-2 असा सहज पराभव करून दुसरी फेरी गाठली.

स्पर्धेचे उदघाटन ओम दळवी मेमोरियल ट्रस्टचे ट्रस्टी उमेश दळवी, स्पर्धा संचालक मारुती राऊत आणि स्पर्धा निरीक्षक प्रविण झिटे यांच्या हस्ते करण्यात आले.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: मुख्य ड्रॉ: पहिली फेरी: मुले:
ईशान सोहनी(तेलंगणा)[1]वि.वि.हर्ष परिहार(महा) 6-3, 6-4;
आरव छल्लानी(महा)वि.वि.नील देसाई(महा) 6-1, 6-0;
विश्वास चंद्रशेखर(महा)वि.वि.अवि मिश्रा(महा)[7] 6-3, 6-2;
कियान पटेल (महा) वि.वि.आरव बेले(महा)[4] 6-2, 0-6, 6-4;
नील बोंद्रे(महा)वि.वि.विश्वदित्य भोर(महा) 6-2, 6-0;
कबीर गुंडेचा(महा)वि.वि.यशवंतराजे पवार(महा) 6-1, 6-2;
शौर्य गडे(महा)[5]वि.वि.दिवित गोसावी(महा) 6-4, 6- 3;
अंशुल पुजारी(महा)वि.वि.शुभ नाहाटा(महा) 6-0, 7-5;
सर्वज्ञ सरोदे(महा)[3]वि.वि.राघव अग्रवाल(महा) 6-0, 6-2;
वीर चतुर(महा)[6]वि.वि.ध्रुव शर्मा(महा) 6-4, 6-3;
सय्यम पाटील(महा)वि.वि.युगंधर शास्त्री(महा)7-6(2), 6-3;
अधिराज दुधाणे(महा)वि.वि.तक्षिल नागर(महा) 6- 2, 7-6(3);

मुली:
अहाना पाटील(महा)वि.वि.मृदुला साळुंखे(महा) 6-3, 6-2;
समिका खन्ना(महा)वि.वि.वान्या अग्रवाल(महा) 6-1, 6-0;
वैष्णवी नागोजी(महा)वि.वि.रिया बांगळे 6- 3, 6-0;