एमएसएलटीए ओम दळवी मेमोरियल एआयटीए 12वर्षाखालील चॅम्पियनशीप सिरीज टेनिस स्पर्धेत विश्वास चंद्रशेखर, विवान मल्होत्रा, शौर्य बोर्‍हाडे, शुभ नाहाटा, विश्वादित्य भोर यांचा मुख्य फेरीत प्रवेश

पुणे, 27 नोव्हेंबर, 2022:  ओम दळवी मेमोरियल ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित एमएसएलटीए ओम दळवी मेमोरियल एआयटीए 12 वर्षाखालील चॅम्पियनशीप  सिरीज टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात विश्वास चंद्रशेखर, विवान मल्होत्रा, शौर्य बोर्‍हाडे, शुभ नाहाटा, विश्वादित्य भोर या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून मुख्य फेरीत प्रवेश केला.
 
महाराष्ट्र पोलीस टेनिस कोर्ट, औंध येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत अंतिम पात्रता फेरीत मुलांच्या गटात विश्वादित्य भोर याने सातव्या मानांकित अवधूत निलाखेचा 6-4,7-5 असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला. चुरशीच्या लढतीत विवान मल्होत्राने दिव्यांग रसगोत्रा वर 3-6, 6-3, 6-4 असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण विजय मिळवला.
मुलांच्या गटात तेलंगणाच्या ईशान सोहनीला, तर मुलींच्या गटात जान्हवी चौगुलेला अग्रमानांकन देण्यात आले आहे.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम पात्रता फेरी: मुले:
विश्वास चंद्रशेखर(1) वि.वि.लक्ष्य त्रिपाठी 6-3, 6-0;
विवान मल्होत्रा  वि.वि.दिव्यांग रसगोत्रा 3-6, 6-3, 6-4;
शुभ नाहाटा (3) वि.वि.अर्णव पांडे 6-1, 6-4;
शौर्य बोऱ्हाडे (4) वि.वि.आर्यन बॅनर्जी 6-4, 6-2;
अनिश वडनेरकर (5) वि.वि.पुरंजय कुतवाल (9) 6-0, 6-3;
राघव अग्रवाल वि.वि.लव परदेशी 6-2,6-0;
विश्वादित्य भोर वि.वि.अवधूत निलाखे (7) 6-4,7-5;
देवित गोसावी वि.वि.नील बोंद्रे 7-5, 6-4.
 
स्पर्धेतील खेळाडूंची मानांकन यादी खालीलप्रमाणे:
मुले:1.इशान सोहनी(तेलंगणा), 2. क्रिशय तावडे (महा), 3. सर्वज्ञ सरोदे (महा), 4.आरव बेले (महा), 5. शौर्य गदादे (महा), 6.वीर चतुर (महा),  7.अवि मिश्रा (महा), 8.त्रिशिक वाकलकर (महा);
 
मुली : 1.जान्हवी चौगुले (महा), 2.ऐश्वर्या स्वामीनाथन (महा), 3.शिबानी गुप्ते (महा), 4.श्रावी देवरे (महा), 5.वीरा हरपुडे (महा), 6.मायरा टोपनो (महा),  7.सारा फेंगसे (महा), 8.सानवी राजू (महा).