लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांची दक्षिण कमांडला भेट

पुणे, ६/८/२०२१:लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे  लष्कराच्या दक्षिण विभागाच्या  दोन दिवसीय दौऱ्यासाठी आले  असून ते पुणे आणि गोव्याला भेट देणार आहेत. आजच्या पुणे भेटीदरम्यान, लष्करप्रमुखांनी पिंपरी इथल्या टाटा मोटर्सला भेट देऊन प्रवासी आणि व्यावसायिक वाहनांच्या निर्मितीचे तसेच अभियांत्रिकी संशोधन केंद्रांचे  निरीक्षण केले.  


टाटा वाहने, झेनॉन, ऑल-व्हील ड्राईव्ह AWD (4×4), सैन्य वाहक, हलकी बुलेट प्रूफ वाहने, कॉंबॅट सपोर्ट वाहने, माईन प्रोटेक्टेड वाहने आणि व्हील्ड आर्मर्ड  AWD (8×8) ही सगळी वाहने त्यांनी पाहिली.


 लष्करप्रमुखांनी लार्सन अँड टूब्रो च्या तळेगाव येथील  सामरिक प्रणाली   संकुलालाही भेट दिली.  भारतीय सैन्यदलांच्या आधुनिकीकरणासाठीच्या त्यांच्या उत्पादन सुविधा, विकासात्मक प्रयत्नांची त्यांनी पाहणी केली. यावेळी लष्करप्रमुखांना संरक्षण विषयक योजना आणि भारतीय लष्करासाठी एल अँड टी करत असलेल्या कामांविषयी माहिती देण्यात आली. संरक्षण क्षेत्रात, आत्मनिर्भरतेला प्रोत्साहन देणाऱ्या, या दोन्ही भारतीय कंपन्यांच्या प्रयत्नांचे लष्करप्रमुखांनी यावेळी कौतुक केले.
 

जनरल नरवणे  उद्या गोव्यात आयएनएस हंसाला भेट देणार आहेत.