‘भारत जोडो ‘अभियानाला पाठिंब्यासाठी पुण्यात पदयात्रा

पुणे : 21 सप्टेंबर 2022: काँग्रेस आणि समविचारी संघटनांनी सुरू केलेल्या ‘भारत जोडो’ अभियानाला पाठिंबा देण्यासाठी पुण्यात ज्योती चौक कोंढवा ते काँग्रेस भवन शिवाजीनगर या मार्गावर ही पदयात्रा काढण्यात आली. इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुपचे संस्थापक अस्लम इसाक बागवान, संतोष म्हस्के ,विलास किरोते, चंद्रकांत निवंगुणे, संकेत मुनोत, भीमाशंकर खटावकर, दादासाहेब गायकवाड, सचिन अल्हाट, राजू सय्यद ,ऋषिकेश गायकवाड , श्बिबवे, फिरोज शेख ,सादिक पानसरे इत्यादी मान्यवर सहभागी झाले.’ नफरत छोडो, संविधान बचाओ ‘ असा संदेश देण्यात आला. लोकशाही, धर्मनिरपेक्षता ,संविधान वाचविण्याचा संदेश या यात्रेतून देण्यात आला.