पुणे, ता. ०६/०७/२०२२: पुणे महापालिकेकडून पाणी कपात सुरू करण्यात आलेली असली तरी १० जुलै रोजी आषाढी एकादशी आणि बकरी ईद हे सण असल्याने चार दिवसांसाठी पाणी कपात मागे घेण्यात आली आहे. ८ जुलै ते ११ जुलै या दरम्यान शहरात नियमित पाणीपुरवठा होईल असे पाणीपुरवठा विभागाने सांगितले आहे.
खडकवासला धरण प्रकल्पातील पाणी साठा कमी झाल्याने महापालिकेने शहरात ४ ते ११ जुलै पर्यंत दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या तीन दिवसांपासून पाणी कपात सुरू असताना शहराच्या अनेक भागात दोन दिवसांपासून पाणी नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. मात्र आता सण आल्याने पुणेकरांना दिलासा मिळाला आहे.
१० जुलै रोजी आषाढी एकादशी आणि बकरी ईद हे दोन्ही सण आलेले आहेत त्यामुळे महापालिका प्रशासनाने ८ जुलै ते ११ जुलै या दरम्यान पाणी कपात मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर म्हणाले, आषाढी एकादशी आणि बकरी ईद एका दिवशीच आहेत त्यामुळे पाणी देणे आवश्यक आहे दहा तारखेला सर्व भागात व्यवस्थित पाणी मिळावे यासाठी आठ तारखेपासूनच शहरात पूर्ण पाणीपुरवठा केला जाणार आहे अकरा तारखे नंतर पाणी कपात राहणार की नाही याबाबत स्वतंत्र आदेश काढले जातील.
More Stories
उद्योजकतेला प्रोत्साहनासाठी ७५ दिवस ७५ शहरात ७५ कार्यक्रमांचे आयोजन
विश्वकर्मा विद्यापीठात स्वातंत्र्यदिन जल्लोषात साजरा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात ध्वजारोहण संपन्न