एमआयडीसीच्या या भागातील गुरुवारी पाणीपुरवठा बंद

पिंपरी,२६ मे २०२१: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) पिंपरी-चिंचवड औद्योगिक क्षेत्रातील रावेत येथील जलशुद्धीकरण केंद्रातील पावसाळा पूर्वीचे देखभाल व दुरुस्तीचे काम येत्या गुरुवारी (दि.27) करण्यात येणार आहे. त्यामुळे एमआयडीसी पाणीपुरवठा करत असलेल्या भागातील गुरुवारचा पाणीपुरवठा सकाळी ८ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत बंद राहणार आहे.असे अधिकाऱ्यांनी सांगितले.गुरुवारी एमआयडीसीकडून होणाऱ्या पिंपरी चिंचवड, भोसरी, देहूरोड, कासारवाडी, फुगेवाडी, निगडी, सीएमई, आर अँड डी, दिघी, व्हीएसएनएल, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड, ओएफडीआर या भागात गुरुवारी दिवसभर पाणीपुरवठा बंद राहणार आहे. असून, शुक्रवारी (दि. २८) पाण्याचा पुरवठा हा कमी दाबाने व अपुरा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक पाण्याचा साठा करावा. पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन एमआयडीसी अधिकाऱ्यांनी केले आहे.