पुणे, दि. २६ मे २०२१: जेवण नीट बनवित नसल्याचा पतीच्या आरोपाचा छळास वंâटाळून पत्नाने गळफास घेउन आत्महत्या केल्याची घटना दोन दिवसांपुर्वी मार्वेâटयार्ड परिसरातील प्रेमनगरमध्ये घडली आहे. याप्रकरणी पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्यामुळे पतीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपाली कांबळे (वय २४) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपालीचे १८ सप्टेबर २०२० मध्ये तरूणासोबत लग्न झाले होते. लग्नानंतर पती दीपालीला सातत्याने तू जेवण नीट बनवित नाही, जेवायला लवकर देत नाही, सासुकडे लक्ष देत नाही, माहेरकडील लोकांसोबत सातत्याने बोलत असते. असा मानसिक छळ केला. त्यानंतर पतीने दीपालीला मारहाण करून एकदाची तू मरत का नाही, असे म्हटले होते. त्यामुळे रागाच्या भरात दीपालीने २४ मे ला राहत्या घरात गळफास घेउन आत्महत्या केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सी. डी. भोसले तपास करीत आहेत.
More Stories
पुणे: लॉकडाउनमुळे कंपनीतील काम गेले, तरूण बनला सराईत चोरटा; तब्बल १७ दुचाकी जप्त
पिंपरीतील पोलीस उपनिरीक्षकाने पुण्यात उकळली खंडणी
पुणे: सराईत पप्पु येणपुरे टोळीविरुध्द मोक्का, पोलीस आयुक्तांकडून कारवाईचा धडाका कायम