नरेंद्र सोपल मेमोरियल आंतर क्लब टेनिस स्पर्धेत महाराष्ट्र मंडळ 1, फर्ग्युसन कॉलेज, टेनिस नट्स पंचायत 2, गोल्डन बॉईज संघांची विजयी सलामी

पुणे,  दि.7 ऑकटोबर 2022: कॅपोविटज प्रायव्हेट लिमिटेड, मानेग्रो आणि टॉवर ट्रान्समिशन यांच्या वतीने आयोजित व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या नरेंद्र सोपल मेमोरियल आंतर क्लब टेनिस  स्पर्धेत साखळी फेरीत टीएफएल(फ्री रॅडिकल्स), महाराष्ट्र मंडळ 1, फर्ग्युसन कॉलेज, टेनिस नट्स पंचायत 2, गोल्डन बॉईज या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी सलामी दिली 
 
एमएसएलटीए टेनिस कोर्ट, म्हाळुंगे बालेवाडी येथे आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत टेनिसनट्स पंचायत 2 संघाने एसेस युनायटेड संघाचा 18-05 असा पराभव करून शानदार सुरुवात केली. विजयी संघाकडून आलोक नायर, सलील, अमित किंडो, केदार बेले, सुधीर पिसाळ, चन्ना कुमार यांनी सुरेख कामगिरी केली. दुसऱ्या सामन्यात अजिंक्य पाटणकर, जितेंद्र सावंत, विकास चौधरी, श्रीराम ओका, केदार राजपाठक, सुरेंद्रन कंडथ यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर टीएफएल(फ्री रॅडिकल्स) संघाने लॉर्ड ऑफ द स्ट्रिंग्स संघाचा 18-03 असा पराभव करून विजयी सलामी दिली.
 
अन्य लढतीत महाराष्ट्र मंडळ 1 संघाने फॉरेस्ट हंटर्स संघावर 16-07 विजय मिळवला. तर, गोल्डन बॉईज संघाने पाल्म चॅलेंजर्स संघाचा 17-07 असा पराभव केला. स्पर्धेचे उदघाटन पीसीएमसी कमिशनर अंकुश शिंदे(आयपीएस) यांच्या हस्ते करण्यात  आले. यावेळी पीएमडीटीएचे सचिव अभिषेक ताम्हाणे, स्पर्धा संचालक समीर भामरे, गौतम सोपल, सुधीर पिसाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
 
स्पर्धेचा सविस्तर निकाल: गट साखळी फेरी:
टीएफएल(फ्री रॅडिकल्स) वि.वि.लॉर्ड ऑफ द स्ट्रिंग्स 18-03(60अधिक गट: अजिंक्य पाटणकर/जितेंद्र सावंत वि.वि.अतुल सरदेसाई/कवलजीत परदेशी 6-2; 80अधिक गट: विकास चौधरी/श्रीराम ओका वि.वि.मनीष सिंघल/कमलेश रघानी 6-0; 90 अधिक गट: केदार राजपाठक/सुरेंद्रन कंडथ वि.वि.सुदीप बत्रा/अतुल पटेल 6-1);
 
फर्ग्युसन कॉलेज वि.वि.तीर्थ टॉवर्स 18-03(60 अधिक गट: पंकज यादव/गणेश देवखिले वि.वि.केतन गद्रे/अनुप नायर 6-1; 80 अधिक गट: महेंद्र देवकर/संजय पाटील वि.वि.आलोक सैनी/हिरेन कुमार 6-0; 90 अधिक गट: पंकज यादव/गणेश देवखिले वि.वि.संजय डेरे/विशाल लूड 6-2);
 
महाराष्ट्र मंडळ 1 वि.वि.फॉरेस्ट हंटर्स 16-07(60अधिक गट: अभिषेक चव्हाण/डॉ. विकास बचलू वि.वि.आदित्य भार्गवा/राज परसाई 6-0; 80अधिक गट: राजेंद्र देशमुख/अर्पित श्रॉफ वि.वि.शिवेश गुप्ता/जिग्नेश शहा 6-0; 90 अधिक गट: विक्रम श्रीश्रीमल/कमलेश शहा पराभुत वि.संदीप बेडेकर/गुलशन वासवानी 4-6);
 
टेनिसनट्स पंचायत 2 वि.वि.एसेस युनायटेड 18-05(60अधिक गट:आलोक नायर/सलील वि.वि.हुजेफा हकीम/दर्शन गुप्ता 6-2; 80अधिक गट: अमित किंडो/केदार बेले वि.वि.रतीश रतुसरिया/रोहन नाईक 6-3; 90अधिक गट: सुधीर पिसाळ/चन्ना कुमार वि.वि.बद्री पूनावाला/निखिल भगत 6-0);
 

गोल्डन बॉईज वि.वि.पाल्म चॅलेंजर्स 17-07(60अधिक गट: आशिष पुंगलिया/मुकुंद जोशी वि.वि.मनवेंद्र नायक/गौरव बाकलीवाल 6-0; 80अधिक गट: प्रशांत जेटली/आनंद कोटस्थाने पराभुत वि.रमेश पमनानी/संतोष रणसुभे 5-6(3-7); 90 अधिक गट: जितेंद्र जोशी/केदार पाठक वि.वि.सूर्यप्रकाश गुप्ता/यतेंद्रा गुप्ता 6-1).