आर्यन खान ड्रग्ज प्रकरण: साक्षीदार फरारी किरण गोसावी याची सहायक महिला जेरबंद

पुणे, १८/१०/२०२१: अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात एनसीबीकडून साक्षीदार करण्यात आलेल्या किरण गोसावी याची सहायक असलेल्या महिलेला पुणे पोलिसांनी मुंबईतील गोवंडीमधून अटक केली.

शेरबानो मोहम्मद इरफान कुरेशी वय २७ रा. बैगनवाडी रोड, गोवंडी मुंबई) असे तिचे नाव आहे. नोकरीच्या आमिषाने गोसावीने अनेक तरुणांना आर्थिक गंडा घातला आहे. त्याने तरुणाकडून घेतलेले पैसे शेरबानुच्या बँक खात्यावर आल्याचे पोलिसांना तपासात आढळून आले. त्यानुसार तिला अटक करण्यात आल्याची माहिती फरासखाना पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी दिली आहे.

 

पुणे पोलिसांकडे दाखल असलेल्या फसवणूकीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी किरण गोसावी याच्याविरुद्ध काही दिवसांपुर्वी लुकआऊट नोटीस काढण्यात आली आहे. क्रुज पार्टीतील आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात गोसावी एनसीबीच्यावतीने साक्षीदार आहे. २०१८ मध्ये पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात गोसावी व त्याची सहायक असलेली शेरबानु यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल आहे. तेव्हापासून दोघे फरार आहेत. पुणे पोलिसांनी शेअरबानूला गोवंडी येथून ताब्यात घेतले. ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आलेला आर्यन खान याला पकडून एनसीबी कार्यालयात नेताना गोसावी याने सेल्फी घेतलेला फोटो व्हायरल झाला होता.

पुण्यातील हे आहे प्रकरण
किरण गोसावी याने २०१८ मध्ये फेसबुकवर मलेशियात हॉटेलमध्ये नोकरीची संधी अशी पोस्ट टाकली होती. त्यानुसार कसबा पेठेत राहणाNया चिन्मय देशमुख याने त्याच्यासोबत संपर्वâ साधला. नोकरीच्या बहाण्याने गोसावीने चिन्मयकडून ३ लाख रुपये घेऊन मलेशियाला पाठविले होते. मात्र, तेथे नोकरी न मिळाल्याने चिन्मय पुन्हा हिंदुस्थानात आले. त्यानंतर त्यांनी फरासखाना पोलिसांकडे फिर्याद दिली होती.