पुणे : सीए महिलेच्या आत्महत्या प्रकरणी पती अटक

पुणे, ०७/०८/२०२१: सासरच्या मंडळीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याच्या प्रकरणात येरवडा पोलिसांनी तिच्या पतीला अटक केली आहे.

रेणू स्वप्निल बाफना (वय ३५, रा. द्वारका सोसायटी, रामवाडी गावठाण) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. तिचा पती स्वप्निल रमेशचंद्र बाफना, वय ३५) यास अटक केली आहे. सासू वर्षा रमेशचंद्र बाफना (वय ५८), सासरा रमेशचंद्र बाफना (वय ७५, रा. रा. द्वारका सोसायटी, रामवाडी गावठाण) या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. संजय उमेदलाल संचेती (वय ५८, रा. निगडी प्राधिकरण) यांनी यासंदर्भात येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “रेणू या सीए म्हणून काम करत होत्या. त्यांता २०१३ मध्ये स्वप्निल बाफना याच्या सोबत विवाह झाला होता. संसार करताना सासू वर्षा ही रेणू यांना लहानसहान कामावरून टोमणे मारून अपमानीत करीत, पती स्वप्निल सोबत बोलू देत नसत. रेणू यांना काम येत नसल्याने शिवीगाळ करून शारिरीक व मानसिक त्रास दिला. काही वेळेस त्यांना मारहाण देखील करण्यात आली. या त्रासाला वैतागून रेणू यांनी ६ ऑगस्ट रोजी आत्महत्या केली. याप्रकरणी रेणू यांच्या वडिलांनी तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) मोहिनी डोंगरे करत आहेत.