पुणे: कौटुंबिक वादातून महिला शिपायाची आत्महत्या

पुणे, ०५/०७/२०२१: कौटुंबिक वादातून महिला शिपायाने गळफास घेउन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना वाकडमधील पोलीस लाईनमध्ये घडली आहे. श्रद्धा जायभाय (वय २८, रा. कावेरीनगर पोलीस लाईन, वाकड)  असे आत्महत्या केलेल्या महिला शिपायाचे नाव आहे.
श्रद्धा पुणे पोलीस विशेष शाखेतील बंदोबस्त विभागात कार्यरत होत्या. त्यांचे पती नेव्हीमध्ये कामाला असून त्यांना चार वर्षांची मुलगी आहे. दरम्यान, मुलीचा सांभाळ करण्यावरून त्यांच्यात वादावादी झाली होती. त्याच रागातून श्रद्धा यांनी गळफास घेउन आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी वाकड पोलीस तपास करीत आहेत.