टँकरच्या चाकाखाली आल्याने महिला ठार, पती जखमी

पुणे, १५ जुन २०२१- दुचाकी घसरून खाली पडल्यामुळे पाठीमागून भरधाव टँकरचालकाने दिलेल्या धडकेत महिला जागीच ठार झाली. तिचा पती जखमी झाला आहे. हा अपघात रविवारी संध्याकाळी सातच्या सुमारास थेउर परिसरातील वुंâजीर पाटील वस्तीजवळ झाला. भाग्यश्री श्रीकृष्ण प्रभुणे (वय २८, रा. बारामती) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक शिवाजी शिंदे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

रविवारी संध्याकाळी पावणेसातच्या सुमारास भाग्यश्री आणि त्यांचे पती श्रीकृष्ण दुचाकीवरून थेउरकडे चालले होते. त्यावेळी वुंâजीरपाटील वस्तीनजीक रस्त्यावर त्यांची दुचाकी घसरल्यामुळे दोघेही खाली पडले. त्याचवेळी पाठीमागून वेगाने आलेल्या टँकरचालकाने भाग्यश्री यांच्या अंगावरून चाक घातले. त्यामुळे गंभीररित्या जखमी झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर पती श्रीकृष्ण जखमी झाले आहेत. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी तपास करीत आहेत.