पुणे: नाणेघाटजवळ जीवधन किल्ल्यावर पाय घसरून दिल्लीतील तरुणी ठार

पुणे, ४/८/२०२१: जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील जीवधन किल्ल्यावरून पाय घसरून तरुणी ठार झाल्याची घटना आज दुपारी बाराच्या सुमारास घडली आहे. रुचिका संजू शेठ (वय ३०, मूळ- दिल्ली) असे ठार झालेल्या तरुणीचे नाव आहे.

रुचिका आणि तिघे मित्र जीवधन किल्ल्यावर आज सकाळी फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी रुचिका खाली उतरत असताना पायरीवरून पाय घसरून रुचिका खाली पडली. त्यानंतर तिच्या मित्रांनी पोलीस आणि गावकऱ्यांना माहिती दिली. तिचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आला आहे.

याप्रकरणी जुन्नर पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अशी माहिती जुन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी दिली आहे.