बोपोडीत टोळक्याकडून तरूणावर वार ८ ते १० जणांविरूद्ध गुन्हा दाखल

पुणे, दि. २९ (प्रतिनिधी) -किरकोळ कारणावरून दुचाकीस्वार तरूणाला शिवीगाळ करून साथीदारांना बोलावून वार केल्याची धक्कादायक घटना सोमवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास बोपोडीत घडली. हल्ल्यात अभिषेक तुकाराम मोरे (वय ३०, रा. बोपोडी ) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी रोहित गद्रे (वय ३३) याच्यासह ८ ते १० जणांविरूद्ध खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभिषेक आणि रोहित एकमेकांच्या ओळखीचे असून बोपोडी परिसरात राहायला आहे. काल संध्यकाळी दोघांमध्ये किरकोळ कारणांवरून वाद झाला. त्याचा राग आल्यामुळे रोहितने साथीदारांना बोलावून घेत अभिषेकचा पाठलाग केला. त्याच्यावर पालघनने वार करून जखमी केले. त्यानंतर साथीदारांनी दांडक्याने मारहाण केली. याप्रकरणी खडकी पोलीस तपास करीत आहेत.