पुणे: गाडीचा धक्का लागल्याच्या वादातून केला खून, पाचजणांना अटक

पुणे, दि. ०५/०८/२०२२ – गाडीचा धक्का लागल्याच्या वादातून तरूणावर वार करून खून केल्याची घटना ३ ऑगस्टला कोंढवा खुर्दमधील शिवनेरीनगरमध्ये घडली होती. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी पाचजणांना अटक केली.

 

अमर गव्हाणे (वय ३४) , राजकुमार लक्ष्मण पवार (वय २९), कृष्णा गणेश मराठे (वय ३१), सचिन विष्णू राठोड (वय २२), गणेश राजाराम हाके (वय ४६ सर्व रा. कोंढवा खुर्द) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. महेश लक्ष्मण गुजर (वय २३) असे खून केलेल्याचे नाव आहे. सोनी गुजर (वय २१) यांनी फिर्याद दिली आहे.

 

फिर्यादी गुजर आणि आरोपी शिवनेरीनगर परिसरात राहायला आहेत. काही दिवसांपुर्वी महेशच्या गाडीचा धक्का आरोपी अमरला लागला होता. त्याच रागातून टोळक्याने ३ ऑगस्टला रात्री आठच्या सुमारास महेशवर पालघनने वार करून गंभीररित्या जखमी करीत खून केला. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेउन आरोपींना अटक केली. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, पोलीस निरीक्षक संजय मोगले यांच्या पथकाने केली.