December 2, 2025

श्री गुरु गोबिंद सिंग चॅलेंजर्स करंडक फुटबॉल स्पर्धेत 18 संघ सहभागी

पुणे, 23 फेब्रुवारी 2024: फुटबॉल असोसिएशन ऑफ पुणे यांच्या तर्फे व इलाईट स्पोर्ट्स इव्हेंट्स यांच्या संलग्नतेने आयोजित श्री गुरु गोबिंद सिंग चॅलेंजर्स करंडक फुटबॉल स्पर्धेत 18 संघांनी आपला सहभाग नोंदवला आहे. ही स्पर्धा खराडी येथील ढोले पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या हॉटफुट फुटबॉल मैदानावर 24 फेब्रुवारी ते 10मार्च 2024 या कालावधीत होणार आहे.

स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना सोहन सिंग सोना यांनी सांगितले की, स्पर्धेत खुल्या गटात स्ट्रायकर्स एफसी, स्वराज एफसी, फातिमा इलेव्हन, शिवनेरी एफसी, सीएमएस फाल्कन्स अ, सीएमएस फाल्कन्स ब, जुन्नर एफसी, मंचर सिटी एफसी, जोसेफ अकादमी, स्पोर्टझिला, फलटण जिमखाना, पोचर्स, ॲव्हेंजर्स, रॉकर बॉईज, सीओईटी, विशाल एफसी, विशियस एफसी आणि पॉवर पफ बॉईज एफसी या संघानी आपला सहभाग नोंदवला आहे. तसेच, हि स्पर्धा बाद पद्धतीने खेळविण्यात येणार आहे. स्पर्धेला ओबेरॉय ओव्हरसीज एज्युकेशन, खालसा डेअरी आणि हॉटफूट यांचे प्रायोजकत्व लाभले आहे. स्पर्धेत एकूण 1लाख रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत.