April 24, 2024

एमएसएलटीए आयकॉन रियल्टी करंडक अखिल भारतीय मानांकन(16वर्षाखालील) चॅम्पियनशिप सिरीज टेनिस स्पर्धेत श्रेया पठारे, रिशीता पाटील, आराध्य म्हसदे, शार्दुल खवले यांना दुहेरी मुकुटाची संधी

पुणे, 22 फेब्रुवारी 2024: ओम दळवी मेमोरियल ट्रस्ट यांच्या तर्फे व शेपिंग चॅम्पियन्स फाऊंडेशन पुणे यांच्या संलग्नतेने आयोजित एमएसएलटीए आयकॉन रियल्टी करंडक अखिल भारतीय मानांकन(16वर्षाखालील) चॅम्पियनशिप सिरीज टेनिस स्पर्धेत मुलींच्या गटात श्रेया पठारे, रिशीता पाटील यांनी, तर मुलांच्या गटात आराध्य म्हसदे, शार्दुल खवले यांनी एकेरी व दुहेरी या दोन्ही गटात अंतिम फेरीत प्रवेश करत दुहेरी मुकुटाकडे वाटचाल केली आहे.

महाराष्ट्र पोलिस टेनिस जिमखाना(एमटी),परिहार चौक, औध येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मुलींच्या गटात उपांत्य फेरीत अव्वल मानांकित श्रेया पठारेने तिसऱ्या मानांकित काव्या देशमुखचा 2-6, 6-3, 6-3 असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. चौथ्या मानांकित रिशीता पाटील हीने दुसऱ्या मानांकित अद्विता गुप्ताचा 6-4, 6-0 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली.

मुलांच्या गटात उपांत्य फेरीत अव्वल मानांकित आराध्या म्हसदेने अर्जून वेल्लुरीचा 6-1, 6-4 असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. बिगर मानांकित शार्दुल खवले याने दुसऱ्या मानांकित सक्षम भन्साळीचा 4-6, 6-2, 6-4 असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव करून आगेकूच केली.

दुहेरीत उपांत्य फेरीत मुलांच्या गटात रिशिता पाटील व श्रेया पठारे यांनी मीरा बांगले व रिया बांगले यांचा 6-0, 6-0 असा एकतर्फी पराभव केला. सारा फेंगसेने प्रार्थना खेडकरच्या साथीत अनुष्का जोगळेकर व काव्या पांडेचा 6-2, 3-6, 10-7 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.

मुलांच्या गटात शार्दुल खवले व वरद पोळ या अव्वल मानांकित जोडीने शौनक सुवर्णा व वरद उंद्रे यांचा 6-3, 7-6(2) असा तर, आराध्य म्हसदे व दक्ष पाटील यांनी नील आंबेकर व अथर्व येलभर यांचा 6-2, 6-1 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली.

निकाल: मुख्य ड्रॉ: उपांत्य फेरी: मुले:
आराध्या म्हसदे(1) वि.वि.अर्जुन वेल्लुरी 6-1, 6-4;
शार्दुल खवले वि.वि. सक्षम भन्साळी(2) 4-6, 6-2, 6-4;

मुली: उपांत्य फेरी:
श्रेया पठारे(1)वि.वि. काव्या देशमुख(3)2-6, 6-3, 6-3;
रिशीता पाटील(4) वि.वि.अद्विता गुप्ता(2)6-4, 6-0;

दुहेरी गट: उपांत्य फेरी:
रिशिता पाटील/श्रेया पठारे वि.वि.मीरा बांगले/रिया बांगले 6-0, 6-0;
सारा फेंगसे/प्रार्थना खेडकर वि.वि.अनुष्का जोगळेकर/काव्या पांडे 6-2, 3-6, 10-7;

मुले:
शार्दुल खवले/वरद पोळ(1) वि.वि. शौनक सुवर्णा/वरद उंद्रे 6-3, 7-6(2);
आराध्य म्हसदे/दक्ष पाटील वि.वि. नील आंबेकर/अथर्व येलभर 6-2, 6-1.