पुणे, 11 फेब्रुवारी 2025 – पुना क्लब लिमिटेडच्या वतीने अकराव्या पुना क्लब प्रीमियर लीग क्रिकेट 2025 स्पर्धेत साखळी फेरीत व्हीएनएन तलब क्वालिटी वॉरियर्स, ओबेरॉय आणि नील किंग्ज या संघांनी सलग दुसरा विजय मिळवला.
पुना क्लब क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत झियान तलब(नाबाद 59 व 1-4)याने केलेल्या उत्कृष्ट खेळीच्या जोरावर व्हीएनएन तलब क्वालिटी वॉरियर्स संघाने परमार ऑल स्टार्स संघाचा 34 धावांनी पराभव करून दुसरा विजय मिळवला.
काल रात्री उशिरा झालेल्या लढतीत भार्गव पाठक 1-13 व नाबाद 67) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर मनप्रीत अँड जीजीज जॅग्वार्स संघाने जेट्स संघावर 8 गडी राखून विजय मिळवला. क्रिश शहा याने नाबाद 64 धावांच्या जोरावर जीएम टायफून्स संघाने फोर ओक्स सेलर्स संघाचा 8 गडी राखून पराभव केला. आधिश शहा(2-2 व 42धावा) याने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर ओबेरॉय आणि नील किंग्ज संघाने हिलयॉस इगल्स संघाचा 7 गडी राखून पराभव करून दुसरा विजय मिळवला.
निकाल: गट साखळी फेरी:
गट ब: व्हीएनएन तलब क्वालिटी वॉरियर्स: 6षटकात 3बाद 92धावा(झियान तलब
नाबाद 59(20, 7×4,4×6), रिषभ बजाज 17, विनीत परमार 1-13) वि. वि. परमार
ऑल स्टार्स: 6षटकात 4बाद 58धावा(प्रकाश कारिया 25, रोहित 18, झियान तलब
1-4); सामनावीर – झियान तलब; व्हीएनएन तलब क्वालिटी वॉरियर्स संघ 34
धावांनी विजयी;
गट अ: जेट्स: 6षटकात 3बाद 81धावा(पुनीत सामंत 56(19,7×4,3×6), करण नाबाद
18, भार्गव पाठक 1-13)पराभुत वि.मनप्रीत अँड जीजीज जॅग्वार्स:4.2 षटकात
1बाद 86धावा(भार्गव पाठक नाबाद 67(18,1×4,10×6), सिद्धांत धर्मा 14, नीव
नवानी 1-14); सामनावीर – भार्गव पाठक; मनप्रीत अँड जीजीज जॅग्वार्स संघ 8
गडी राखून विजयी;
गट ब: फोर ओक्स सेलर्स:6 षटकात 3बाद 96धावा(रौनक ढोले पाटील नाबाद
71(22,2×4,8×6), तारिक 18)पराभुत वि.जीएम टायफून्स: 5.5षटकात 1बाद
101धावा(क्रिश शहा नाबाद 64(20,2×4,8×6), अश्विन शहा 31(14,1×4,3×6),
जगदीश आरोके 1-10); सामनावीर – क्रिश शहा; जीएम टायफून्स संघ 8गडी राखून
विजयी;
गट अ: हिलयॉस इगल्स:6 षटकात 3बाद 73धावा(सुमेध गांगल 36(13,3×4,3×6),
सुशांत खोसला नाबाद 18, झमीर शेख नाबाद 11, आधिश शहा 2-2) पराभुत
वि.ओबेरॉय आणि नील किंग्ज: 6षटकात 1बाद 76धावा(आधिश शहा 42(21,5×4,1×6),
तुषार आसवानी नाबाद 26(12, 3×4,1×6), अरुण खट्टर 1-9); सामनावीर- आधिश
शहा; ओबेरॉय आणि नील किंग्ज संघ 7 गडी राखून विजयी;
More Stories
पीवायसी मोतीलाल ओसवाल खुल्या स्नूकर स्पर्धेत दिग्विजय कडियन, महेश जगदाळे, पारस गुप्ता, विजय निचानी, लक्ष्मण रावत, हिमांशू जैन यांची आगेकूच
एमएसएलटीए अनिकेत वाकणकर टेनिस अकादमी पीएमडीटीए अखिल भारतीय मानांकन सुपर सिरिज 12 वर्षाखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत हर्ष नागवानी, अहान जैन, अबीर सुखानी, मायरा शेख, सतेश्री नाईक, शौर्या पाटील, आस्मि पित्रे यांचा उपांत्य फेरीत प्रवेश
पीवायसी मोतीलाल ओसवाल खुल्या स्नूकर स्पर्धेत सोनू मातंगचा सनसनाटी विजय