पुणे, 3 नोव्हेंबर 2023: पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे पीएमडीटीए मानांकन वैभव फायनेस टेनिस अकादमी ब्रॉन्झ सिरिज 2023 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 4 व 5 नोव्हेंबर 2023 या कालावधीत होणार आहे.
स्पर्धेत एकूण 120 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला आहे. 8 व 10 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील ही स्पर्धा वैभव फायनेस टेनिस अकादमी, लॉ कॉलेज रोड या ठिकाणी होणार आहे. स्पर्धेतील विजेत्या व उप विजेत्या खेळाडूंना करंडक व प्रशस्तिपत्रक अशी पारितोषिके देण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी तेजल कुलकर्णी यांची स्पर्धा निरीक्षक म्हणून निवड करण्यात आली असल्याचे स्पर्धा संचालक वैभव अवघडे यांनी सांगितले.

More Stories
डकारचे आव्हान संजय दुसऱ्यांदा पेलणार, नववर्षातील रॅलीसाठी सज्ज
योनेक्स सनराईज डेक्कन जिमखाना आणि एसबीए कप डिस्ट्रिक्ट सुपर 100 मानांकन बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत जिल्ह्यातून 515 खेळाडू सहभागी
महाराष्ट्र क्रिकेट संघटना पुरुष कॉर्पोरेट चषक स्पर्धा २०२५–२६ ः पुनीत बालन क्रिकेट अकॅडमीचा दणदणीत विजय