पुणे, 6 ऑक्टोबर 2023: पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे पीएमडीटीए मानांकन ओम दळवी मेमोरियल टेनिस स्कूल ब्रॉन्झ सिरिज 2023 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 7 व 8 ऑक्टोबर 2023 या कालावधीत होणार आहे.
स्पर्धेत एकूण 160 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला आहे. 12 व 14 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील ही स्पर्धा महाराष्ट्र पोलीस टेनिस जिमखाना, परिहार चौक, औंध या ठिकाणी होणार आहे. स्पर्धेतील विजेत्या व उप विजेत्या खेळाडूंना करंडक व प्रशस्तिपत्रक अशी पारितोषिके देण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी रेशम रणदिवे यांची स्पर्धा निरीक्षक म्हणून निवड करण्यात आली असल्याचे स्पर्धा संचालक उमेश दळवी यांनी सांगितले.

More Stories
डकारचे आव्हान संजय दुसऱ्यांदा पेलणार, नववर्षातील रॅलीसाठी सज्ज
योनेक्स सनराईज डेक्कन जिमखाना आणि एसबीए कप डिस्ट्रिक्ट सुपर 100 मानांकन बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत जिल्ह्यातून 515 खेळाडू सहभागी
महाराष्ट्र क्रिकेट संघटना पुरुष कॉर्पोरेट चषक स्पर्धा २०२५–२६ ः पुनीत बालन क्रिकेट अकॅडमीचा दणदणीत विजय