April 29, 2024

टीपीएल – पीएमडीटीए 16 व 18 वर्षांखालील टेनिस स्पर्धेत 50 खेळाडूंचा सहभाग

पुणे, 12 एप्रिल 2024: मंदार वाकणकर टेनिस अकादमीव गोल्ड लिफ यांच्या तर्फे व पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या मान्यतेखाली टीपीएल – पीएमडीटीए 16 व 18 वर्षांखालील टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 13 व 14 एप्रिल 2024 या कालावधीत एसपी महाविद्यालयाच्या टेनिस कोर्टवर होणार आहे.
 
स्पर्धेत शहरातून 50 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला असून हि स्पर्धा  16 व 18 वर्षांखालील एकेरी व दुहेरी गटात होणार आहे. स्पर्धेत स्वर्णिम येवलेकर, अथर्व येलभर, सनत कडले, वैष्णव रानवडे, काव्या देशमुख, अनुष्का महामुनी, श्रीया रांजळकर हे मानांकित खेळाडू झुंजणार आहेत. स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक व प्रशस्तिपत्रक अशी पारितोषिके देण्यात येणार असल्याची माहिती स्पर्धा संचालक मंदार वाकणकर यांनी दिली.