पुणे, दि.13 ऑगस्ट 2026 – पीवायसी हिंदू जिमखाना आयोजित तिसऱ्या पीवायसी स्नुकर अँड बिलियर्डस लीग स्पर्धेत 58 खेळाडूंनी आपला सहभाग निश्चित केला आहे.हि स्पर्धा 16 ते 22 ऑगस्ट 2026 या कालावधीत पीवायसी जिमखाना येथील स्नुकर अँड बिलियर्डसमध्ये रंगणार आहे.
आम्ही पीवायसी हिंदू जिमखाना येथे विविध क्रीडाप्रकारांच्या लीग स्पर्धा आयोजित करीत असतो. सलग तिसऱ्या वर्षी सभासदांसाठी स्नुकर अँड बिलियर्डस लीग स्पर्धा आयोजित करताना आम्हांला आनंद होत आहे, असे पीवायसीचे अध्यक्ष कुमार ताम्हाणे यांनी सांगितले.
क्लबचे मानद सचिव दिपक गाडगीळ म्हणाले, की आम्ही याआधी क्रिकेट, बॅडमिंटन, फुटबॉल, बास्केटबॉल, बुद्धिबळ, टेबल टेनिस, पिकलबॉल, स्विमिंग व कॅरम लीग स्पर्धा आयोजित केल्या आहेत. आम्ही सभासदांचे आरोग्य व मनोरंजनासाठी विविध प्रकारे प्रयत्न करीत असतो. स्नुकर अँड बिलियर्डस लीगमुळे सभासदांना एका व्यासपीठावर येण्यास, तसेच स्नुकर अँड बिलियर्डससारख्या खेळाच्या माध्यमातून परस्पर नातेसंबंध दृढ होण्यास साहाय्य होणार आहे.
स्नूकर व बिलियर्ड्स विभागाचे सचिव नंदन डोंगरे पुढे म्हणाले की, या लीगमध्ये पाच संघ भाग घेणार आहेत संघांची नावे पुढीलप्रमाणे आहेत: बदामीकर स्टार्स(मालक सिद्धार्थ बदामीकर), स्कायलाईन स्ट्रायकर्स(मालक अमेय जोशी), टीपी रॉकेट्स(तुषार मेंगाळे, प्रशांत कुलकर्णी), सुप्रीम एसेस(मालक संजीव पटेल) व क्यु मास्टर्स(अमीर अजगावकर).
लिलावात सर्वाधिक किंमत व पसंती मिळालेले खेळाडू असे आहेत- योगेश लोहिया हा महागडा खेळाडू ठरला असून क्यु मास्टर्स संघाने 6700पॉईंट्सला विकत घेतले आहे.
स्पर्धेच्या यशस्वी संयोजनासाठी संयोजन समिती स्थापन करण्यात आली असून यामध्ये नंदन डोंगरे, अभिषेक ताम्हाणे, कर्णा मेहता, रणजीत पांडे यांचा समावेश आहे.

More Stories
स्पर्धा व्यवस्थापनासाठी एआयटीए तर्फे नव्या स्वयंचलित(ऑटोमेटेड) प्रणालीची घोषणा
सुशांत चिपलकट्टीच्या स्मरणार्थ पुणे महापौर करंडक योनेक्स सनराईज भारतीय कुमार आंतरराष्ट्रीय ग्रँड प्रिक्स बॅडमिंटन स्पर्धेत पाच मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का
सुशांत चिपलकट्टीच्या स्मरणार्थ पुणे महापौर करंडक योनेक्स सनराईज भारतीय कुमार आंतरराष्ट्रीय ग्रँड प्रिक्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या देव रुपारेलिया, लक्ष्या राजेश यांना अग्रमानांकन