पुणे, १५ आॅक्टोबर २०२४ ः महायुतीने आज राज्यपाल नियुक्त सात आमदारांच्या नावाची घोषणा केली त्यामध्ये पुण्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांना संधी मिळेल अशी भावना कार्यकर्त्यांची होती. मानकर यांनी त्यांचे प्रतिष्ठापनाला लावलेली होती. मात्र आजच्या यादीमध्ये मानकर यांच्या नावावर फुली मारण्यात आल्याचे स्पष्ट झालेले आहे. त्यामुळे नाराज झालेल्या मानकर समर्थकांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे. तसेच आगामी निवडणुकीत महायुतीचे काम न करण्याचा इशारा त्यांनी दिलेला असल्यामुळे पुण्यातील महायुतीचे टेन्शन वाढले आहे.
राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्यांची नावे जाहीर करुन मंगळवारी त्यांचा शपथविधी पार पडला. दरम्यान, शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्यत्वासाठी संधी मिळावी, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी पक्षाकडे केली होती. मात्र, ही संधी हुकल्याने मंगळवारी दुपारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची गुप्ते मंगल कार्यालयात बैठक झाली. त्यामध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली, त्यानंतर ६०० पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा सामुहीक राजीनामा दिला. जोपर्यंत पवार यांच्याकडुन ठोस शब्द मिळत नाही, तोपर्यंत आम्ही महायुतीचे काम करणार नाही, अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी घेत निवेदन पाठविले आहे.
पक्षाचे शहर उपाध्यक्ष व विरोधी पक्षनेते दत्ता सागरे, पर्वती विधानसभा अध्यक्ष संतोष नांगरे, कोथरूड विधानसभा अध्यक्ष हर्षवर्धन मानकर, कोथरूड विधानसभा महिला अध्यक्ष तेजल दुधाने, कॅन्टोन्मेंट विधानसभा महिला अध्यक्ष शशिकला गायकवाड, शिवाजीनगर विधानसभा अध्यक्ष अभिषेक बोके, कार्याध्यक्ष बाळासाहेब आहेर यांच्यासह सीमा साळवे, राहुल तांबे, समीर चांदेरे, समीर शेख, पूजा झोळे, शुभम माताळे, जयदेव इसवे, हरेश लडकत आदींचा समावेश आहे.
More Stories
पुणेकरांचा बंडखोरांना ठेंगा, ५७ वर्षात एकाचाही विजय नाही
आपल्यातील राजकीय शत्रुत्वाचा सूड महिलांवर काढू नका – देवेंद्र फडणवीसांचा मविआच्या नेत्यांवर टीका
शरद पवारांच्या व्यंगावर बोलल्याने अजित पवार भडकले, सदाभाऊ खोतांना दिला इशारा