September 24, 2025

पीएमडीटीए-केपीआयटी- आयकॉन-सोलिंको ब्रॉन्झ सिरिज 2024 स्पर्धेत 89 खेळाडूंचा सहभाग

पुणे, 5 जानेवारी 2024: पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे पीएमडीटीए-केपीआयटी- आयकॉन-सोलिंको  12 व 14 वर्षाखालील ब्रॉन्झ सिरिज टेनिस  2024 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 6 व 7 जानेवारी  2024 या कालावधीत होणार आहे.
 
पीएमडीटीए मानांकन आयटीए करंडक 12 वर्षाखालील टेनिस स्पर्धा खराडी येथे इंटेनसिटी  टेनिस अकादमी टेनिस कोर्टवर तर,  पीएमडीटीए मानांकन मर्क्युरी फाउंडेशन 14वर्षाखालील टेनिस स्पर्धा मोरया गोसावी टेनिस कोर्ट, चिंचवडगाव या ठिकाणी पार पडणार आहे. स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक व प्रशस्तिपत्रक अशी पारितोषिके देण्यात येणार आहे.