पुणे, 5 जानेवारी 2024: पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे पीएमडीटीए-केपीआयटी- आयकॉन-सोलिंको 12 व 14 वर्षाखालील ब्रॉन्झ सिरिज टेनिस 2024 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 6 व 7 जानेवारी 2024 या कालावधीत होणार आहे.
पीएमडीटीए मानांकन आयटीए करंडक 12 वर्षाखालील टेनिस स्पर्धा खराडी येथे इंटेनसिटी टेनिस अकादमी टेनिस कोर्टवर तर, पीएमडीटीए मानांकन मर्क्युरी फाउंडेशन 14वर्षाखालील टेनिस स्पर्धा मोरया गोसावी टेनिस कोर्ट, चिंचवडगाव या ठिकाणी पार पडणार आहे. स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक व प्रशस्तिपत्रक अशी पारितोषिके देण्यात येणार आहे.

More Stories
एमएसएलटीए व डेक्कन जिमखाना बी1 आशियाई कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या दिया रमेश, जेन्सी कानबर यांचा दुसऱ्या फेरीत प्रवेश
एमएसएलटीए व डेक्कन जिमखाना बी1 आशियाई कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत रिभव सारोहा, माओ ताझुरू यांचे विजय
32व्या राष्ट्रीय मास्टर्स टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन