October 22, 2025

सूर्यदत्त ग्रुपतर्फे दहशतवादी हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली

पुणे, 23/04/2025: “पहलगाम दुर्घटनेत मृत्यमुखी पडलेल्या कुटुंबांप्रती सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संवेदना व्यक्त करते. या कुटुंबियांच्या पाठीशी सूर्यदत्त परिवार ठामपणे उभा आहे. आपल्या शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांतून करुणा, न्याय आणि घटनात्मक नीतिमत्ता या मूल्यांची जोपासना सातत्याने सूर्यदत्त करत आहे,” असे मत सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी व्यक्त केले.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप बांधवाना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया आणि उपाध्यक्षा व सचिव सुषमा चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली सूर्यदत्त ग्रुपच्या वतीने कँडल मार्चचे आयोजन केले होते. ‘सूर्यदत्त’च्या सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा, महासंचालक व मुख्य विकास अधिकारी एस. रामचंद्रन, प्राचार्य अरिफ शेख, सायली पांडे, वंदना पांडे, केतकी बापट यांच्यासह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, १००० विद्यार्थ्यांनी या मार्चमध्ये सहभाग घेतला. दुःख आणि करुणेच्या भावनेने सर्वानी एकत्र येत एकतेचे प्रतीक दाखवून दिले.

सूर्यदत्त विधी महाविद्यालय (एसएलसी), सूर्यदत्त कॉलेज ऑफ मॅनेजमेंट इन्फर्मेशन अँड टेक्नॉलॉजी (एससीएमआयआरटी), सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड मास कम्युनिकेशन (एसआयएमएमसी), सूर्यदत्त ज्युनिअर कॉलेज (एसजेसी), सूर्यदत्त कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड ट्रॅव्हल टुरिझम (एससीएचएमटीटी), सूर्यदत्त कॉलेज ऑफ फार्मसी अँड रिसर्च (एससीपीएचआर), सूर्यदत्त इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायबर सिक्युरिटी (एसआयआयसीएस), सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस – कॉलेज ऑफ फिजिओथेरपी (एसआयएचएस-सीओपी), सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी (एसआयबीएमटी) आणि सूर्यदत्त कॉलेज ऑफ नर्सिंग पॅरामेडिकल सायन्स अँड टेक्नॉलॉजी (एससीएनपीएसटी) या संस्थांनी या मॅर्चमध्ये सहभाग
घेतला.

‘सूर्यदत्त’च्या बावधन कॅम्पसपासून कँडल मार्चला सुरुवात झाली. शांततेच्या वातावरणात निघालेल्या या मार्चमधून शांतता, मानवता, राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्यात आला. चांदणी चौक, पाषाण रोड या जवळपास एक ते दीड किलोमीटर परिसरात हा मार्च निघाला. मार्चमध्ये सहभागींनी सौहार्द वाढवणारे आणि हिंसेचा निषेध करणारे संदेश असलेले फलक हातात धरले होते.

स्नेहल नवलखा म्हणाल्या, “हा कँडल मार्च केवळ पीडितांना आदरांजली नाही, तर शांतता, न्याय आणि ऐक्य या मूल्यांना जपण्याबाबत आपल्या बांधिलकीची पुनःप्रतीतीही आहे. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि सहवेदना निर्माण करणे आणि राष्ट्रीय संकटाच्या काळात एकतेचे महत्त्व अधोरेखित करणे हा या मार्चचा हेतू होता. मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी दोन मिनिटांचे मौन पाळण्यात आले आणि उपस्थित सर्वांनी शांतता व सामाजिक सौहार्द यासाठी शपथ घेतली.”

डॉ. आरिफ शेख यांनी विद्यार्थ्यांना आपल्या हृदयात द्वेष न बाळगता समाजात शांतता, एकता आणि करुणेचे दूत होण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन केले. डॉ. सायली पांडे यांनी या आव्हानात्मक काळात सौहार्द आणि सामाजिक एकात्मतेचे मशालधारक बनण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

वंदना पांडे म्हणाल्या, “लोकांबद्दल मनात द्वेषभावना बाळगू नका. त्यांच्या मनात मानवतेचे, करुणेचे बीज पेरा. शांततेवर प्रेम करा. अन्यायाचा, अत्याचाराचा, लोभाचा द्वेष करा. स्वतः या सर्व गोष्टींपासून दूर राहून मानवता, करुणा आत्मसात करा.”

केतकी बापट यांनी विद्यार्थ्यांना द्वेष सोडून शांतता, एकता आणि परस्पर सन्मान या मूल्यांचे सर्व क्षेत्रांत पालन करण्याची शपथ घेण्याचे आवाहन केले. कायद्याचे विद्यार्थी आणि जबाबदार नागरिक म्हणून आपल्याला अशा अमानवी कृत्यांविरुद्ध ठाम आवाज उठवणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

विद्यार्थ्यांनीही यावेळी मनोगत व्यक्त करीत मृतांना श्रद्धांजली अर्पण केली. डॉ. मोनिका सेहरावात यांनी पुढाकाराने सूर्यदत्त ग्लोबल आर्मीने या कँडल मार्चचे शांततेत या कँडल मार्चचे आयोजन केले.