पुणे, २९ ऑक्टोबर २०२५: पुण्यातील नामवंत गोल्फ क्लब पुना क्लब लिमिटेड आणि प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडिया(पीजीटीआय) यांच्या वतीने संयुक्तपणे आयोजित दुसऱ्या पुना क्लब ओपन गोल्फ स्पर्धेत शौर्य भट्टाचार्याने 8 अंडर 63 अशी स्पर्धेतील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदवताना 4 अंडर 67 अशी कामगिरी करणाऱ्या युवराज संधूच्या साथीत दुसरा दिवसा अखेर संयुक्त आघाडीचे स्थान मिळवले. या दोघांनीही आज दिवस अखेर 10 अंडर 132 अशी एकूण कामगिरी नोंदवली.
पूना क्लबच्या गोल्फ कोर्सवर आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत मूळ दिल्लीच्या शौर्याने कालच्या 69 गुणांमध्ये आजच्या 63 गुणांची भर घालताना कालच्या चौदाव्या स्थानावरून तेरा स्थानांनी प्रगती करताना थेट पहिल्या क्रमांकावर झेप घेतली. तर चंदिगडच्या युवराजने कालच्या 65 गुणांमध्ये 67 गुणांची भर घालताना शौर्याच्या साथीत संयुक्त पहिला क्रमांक मिळवला. काल दिवस अखेर येऊन युवराज दुसऱ्या क्रमांकावर होता.
काल दिवस अखेर पहिल्या क्रमांकावर असलेल्या हैदराबादच्या मोहम्मद अझरला आज मात्र केवळ सत्तर गुणांची नोंद करता आल्यामुळे एका स्थानाने आपला अव्वल क्रमांक गमवावा लागला. आज दिवस अखेर तो 8 अंडर 134 अशा कामगिरीसह तिसऱ्या क्रमांकावर राहिला आहे.
पूना क्लब ओपन २०२५ स्पर्धेला यजमान पुना क्लब गोल्फ कोर्स यांच्यासह व्हॅनकॉब आणि एनईसीसी यांचे मुख्य प्रायोजक लाभले असून व्हेंटिव्ह, एसकेएस फास्टनर्स, एलिका, मार्व्हेल रिअल्टर्स, शुबान इन्व्हेस्टमेंटस, डीएफएमसी, ऑटोमेक अँड कायनेटिक, नोव्होटेल पुणे नगर रोड यांचे सह प्रायोजकत्व लाभले आहे. भारतात व्यावसायिक गोल्फ वाढवण्यासाठी पीजीटीआयच्या सततच्या प्रयत्नांना रोलेक्स, अमूल, इंडसइंड बँक, व्हिक्टोरियस चॉईस, कॅम्पा, अमृतांजन इलेक्ट्रो प्लस यांचा पाठिंबा लाभला आहे.
पहिल्या 36 होल नंतर टू ओवर 144 अशी किंवा यापेक्षा सरस कामगिरी करणाऱ्या 57 व्यावसायिक खेळाडूंना यापुढील 36 होल खेळण्याची संधी मिळणार आहे. त्यामध्ये 2024 पीजीटीआय मानांकन विजेता वीर अहलावतने आज दिवस अखेर 6अंडर 136 अशी कामगिरी करताना संयुक्त आठवा क्रमांक मिळवला.
पुण्याच्या अक्षय दामलेने 1अंडर 141 आशा कामगिरी सह 24 वा क्रमांक मिळवताना स्थानिक खेळाडूंमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली. शौर्य भट्टाचार्याने आज एकूण पाच बर्डीची नोंद करताना दहा ते सतरा फूट अंतरावरून उत्कृष्ट पटिंगची नोंद केली. अर्थात त्याने या कामगिरी बरोबरच दोन बोगीच करताना निर्दोष कामगिरी करण्याची संधी गमावली.
आजच्या कामगिरीबद्दल शौर्य म्हणाला की, मला माझ्या ड्रायव्हिंगच्या कामगिरीमध्ये समाधानकारक यश मिळवता आले. मला पटिंग मध्ये सुद्धा चांगली कामगिरी बजावता आली आणि 10फुटांच्या टप्प्यात माझे पटिंग तर सर्वोत्तम होते. या स्पर्धेत गेल्यावर्षी माझी कामगिरी समाधानकारक झाली होती. मला पहिला पण जर खेळाडूंमध्ये स्थान मिळवता आले होते. यावर्षी मला पूर्वार्धापर्यंत पहिला क्रमांक मिळवता आला आहे. परंतु उत्तरार्धात मला सातत्यपूर्ण कामगिरी करावी लागणार आहे. तरच मला विजेतेपदाचे संधी मिळेल.

More Stories
दुसऱ्या पुना क्लब ओपन गोल्फ स्पर्धेत तिसऱ्या फेरीअखेर युवराज संधू आघाडीच्या स्थानावर
पीवायसी व दोशी इंजिनियर्स यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यभरातील खेळाडूंसाठी 16 वर्षाखालील मुलांसाठी क्रिकेट निवड चाचणीचे आयोजन
24व्या गुरू तेगबहादुर गोल्ड कप फुटबॉल स्पर्धेस (24 ऑक्टोबर)पासून सुरुवात