November 18, 2025

दुसऱ्या पुना क्लब ओपन गोल्फ स्पर्धेत तिसऱ्या फेरीअखेर युवराज संधू आघाडीच्या स्थानावर

पुणे, 30 ऑक्टोबर 2025: पुण्यातील नामवंत गोल्फ क्लब पुना क्लब लिमिटेड आणि प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडिया(पीजीटीआय) यांच्या वतीने संयुक्तपणे आयोजित दुसऱ्या पुना क्लब ओपन गोल्फ स्पर्धेत पीजीटीआय मानांकन यादीत अग्रस्थानावर असलेल्या आणि विजेतपदासाठी पसंती देण्यात आलेल्या
युवराज संधू याने अत्यंत अवघड परिस्थितीत आजच्या दिवसातील सर्वोत्तम अशी 6अंडर 65 अशी कामगिरी नोंदवताना तिसऱ्या फेरीअखेर एकट्याने आघाडीच्या स्थानावर झेप घेतली.

पूना क्लबच्या गोल्फ कोर्सवर सुरु असलेल्या या स्पर्धेत काल रात्री पडलेल्या पावसामुळे कोर्सची परिस्थिती खडतर बनलेली असतानाच युवराज ने 65 व 67 असा आधीच्या दोन फेऱ्यांच्या गुणांमध्ये आजच्या 65 गुणांची भर घालताना 16अंडर 197 अशा एकूण कामगिरी सह दुसऱ्या क्रमांकावर खेळाडूवर दोन फटक्यांची आघाडी घेतली आहे.

यंदा पीजीटीआय स्पर्धा जिंकणाऱ्या शौर्य भट्टाचार्यने युवराजच्या पाठोपाठ 67 गुणांची नोंद करताना एकूण 14 अंडर 199 अशा कामगिरीचा दुसरे स्थान राखले आहे. तसेच, पीजीटीआय मानांकन यादीतील माजी अग्रमानांकित खेळाडू. मनु गंडास याने 66 गुणांची नोंद करताना एकूण 11 अंडर 202 अशा कामगिरीसह तिसरा क्रमांक मिळवला आहे.

शिवेंद्र सिंग शिसोदिया आणि जयराज सिंग संधू या दोघांनीही 8 अंडर 205 अशी कामगिरी करताना संयुक्त चौथे स्थान मिळवले आहे.

पूना क्लब ओपन २०२५ स्पर्धेला यजमान पुना क्लब गोल्फ कोर्स यांच्यासह व्हॅनकॉब आणि एनईसीसी यांचे मुख्य प्रायोजक लाभले असून व्हेंटिव्ह, एसकेएस फास्टनर्स, एलिका, मार्व्हेल रिअल्टर्स, शुबान इन्व्हेस्टमेंटस, डीएफएमसी, ऑटोमेक अँड कायनेटिक, नोव्होटेल पुणे नगर रोड यांचे सह प्रायोजकत्व लाभले आहे. भारतात व्यावसायिक गोल्फ वाढवण्यासाठी पीजीटीआयच्या सततच्या प्रयत्नांना रोलेक्स, अमूल, इंडसइंड बँक, व्हिक्टोरियस चॉईस, कॅम्पा, अमृतांजन इलेक्ट्रो प्लस यांचा पाठिंबा लाभला आहे.

त्याआधी काल रात्रीच्या पावसामुळे आज तिसरा फेरीचा खेळ सुरू होण्याआधी दोन तासाचा उशीर झाला. स्थानिक वेळेप्रमाणे सकाळी दहा वाजता खेळ सुरू झाल्यानंतर चुरशीच्या लढती रंगल्या. वीर अहलावत ने 7अंडर 206 अशी कामगिरी करताना तिसऱ्या फेरी अखेर सहावा क्रमांक मिळवला आहे.

पुण्याच्या रोहन ढोले पाटील 2अंडर 211 अशी कामगिरी करताना संयुक्त 20 क्रमांक मिळवला असून तो स्थानिक खेळाडूंमध्ये त्याची कामगिरी सर्वोत्तम ठरली आहे.

तत्पूर्वी यंदा चार स्पर्धा जिंकणारा युवराज संधूने तिसऱ्याच होलला बोगि करताना चूक केली. परंतु पुढच्या बारा होलमध्ये सात वेळा बर्डीची नोंद करताना त्याने जोरदार पुनरागमन केले. अखेरच्या तीन होलमध्ये एक बोगी व एक बर्डी अशा कामगिरी सह त्याने अग्रस्थानाची निश्चित केली.

आजच्या कामगिरीविषयी युवराज संधू म्हणाला की, कालच्या रात्री मुळ एकूणच परिस्थिती अतिशय खडतर बनली होती. परंतु मी आशियामध्ये अनेकदा खेळलो असल्यामुळे अशा हवामानाची मला सवय आहे. त्यामुळे मी या परिस्थितीचा फायदा घेण्याचाच प्रयत्न केला. पावसानंतर ही या कोर्सवरील ग्रीन्स अत्यंत उत्तम सिद्ध होत्या. याबद्दल गोल्फ कोर्सच्या स्टाफला पूर्ण गुण दिले पाहिजेत. खेळ सुरू होण्यास उशीर झाल्यामुळे उलट मला जास्त विश्रांती मिळाली प्रथम त्याचाही मला फायदा झाला. शौर्य बरोबर असलेली स्पर्धा मला नेहमीच खेळाचा दर्जा उंचावण्यास मदत करते. त्यामुळे आजची आघाडी कायम ठेवून उद्या विजेतेपद मिळवण्याचा माझा प्रयत्न असेल.