पुणे, 3 नोव्हेंबर 2025: द पूना क्लब लिमिटेड आणि पीवायसी हिंदू जिमखाना या पुण्यातील प्रतिष्ठित अशा क्रीडा संस्थांच्या वतीने पहिल्या पूना क्लब पीवायसी पिकल बॉल स्पर्धेत आकाश धलवाणी व राहुल गुप्ता, ईशांत रेगे व अनुज मेहता, संग्राम पाटील व कल्पक पत्की यांनी आपापल्या वयोगटातील प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून विजेतेपद संपादन केले.
पूना क्लब जलतरण संकुलात असलेल्या पिकल बॉल कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत 16 ते 32 वर्षांखालील वयोगटात अंतिम फेरीत आकाश धलवाणी याने राहुल गुप्ताच्या साथीत तनिश बेलगलकर व रोनित जोशी यांचा 11-5 असा पराभव करून विजेतेपद पटकावले.
32 ते 50 वयोगटात अंतिम फेरीत इशांत रेगेने अनुज मेहताच्या साथीत रोहन दामले व निषाद चौघुले यांचा 11-6 असा पराभव करून विजेतपदाचा मान पटकावला. 50 वर्षांवरील वयोगटात अंतिम लढतीत संग्राम पाटील व कल्पक पत्की या जोडीने आदित्य खटोड व इंद्रनील मुजगुले यांचा 11-4 असा पराभव करून विजेतपदाला गवसणी घातली.
स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना करंडक व आकर्षक अशी पारितोषिक देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण पूना क्लब लिमिटेडचे अध्यक्ष गौरव गढोक, उपाध्यक्ष इंद्रनील मुजगुले, पीवायसी हिंदू जिमखानाचे सहसचिव सारंग लागू आणि पुसाळकर ग्रुप फाउंडेशनच्या जुई पुसाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पूना क्लब च्या क्रीडा समितीचे चेअरमन तुषार आसवानी, पीवायसी च्या क्रीडा विभागाचे सचिव नंदन डोंगरे आदी मान्यवर उपस्थित होते.
निकाल: 16 ते 32 वयोगट: उपांत्य फेरी:
तनिश बेलगलकर/रोनित जोशी वि.वि. सुमैर पवानी/क्रिश आनंद 11-5;
आकाश धलवाणी/राहुल गुप्ता वि.वि.अर्णव घई/रणवीर आनंद 11-3;
अंतिम फेरी: आकाश धलवाणी/राहुल गुप्ता वि.वि.तनिश बेलगलकर/रोनित जोशी 11-5;
32 ते 50 वयोगट: उपांत्य फेरी:
इशांत रेगे/अनुज मेहता वि.वि.टोनी शेट्टी/रवनीत 11-4;
रोहन दामले/निषाद चौघुले वि.वि.अंकुश मोघे/संग्राम पाटील 11-5;
अंतिम फेरी: इशांत रेगे/अनुज मेहता वि.वि.रोहन दामले/निषाद चौघुले 11-6;
50 वर्षांवरील वयोगट: उपांत्य फेरी:
आदित्य खटोड/इंद्रनील मुजगुले वि.वि.विजय/विक्रम 11-4;
संग्राम पाटील/कल्पक पत्की वि.वि.अश्विन त्रिमल/गौतम लोणकर 11-7;
अंतिम फेरी: संग्राम पाटील/कल्पक पत्की वि.वि.आदित्य खटोड/इंद्रनील मुजगुले 11-4.

More Stories
44 व्या पीएसपीबी आंतर युनिट लॉन टेनिस स्पर्धेचे आयोजन
आयएफएससी आशियाई किड्स चॅम्पियनशिप 2025: कोरियाचे 18 पदकांसह वर्चस्व, तर भारतीय खेळाडूंची सात पदकांसह दमदार कामगिरी
पहिल्या पुना क्लब व पीवायसी पिकल बॉल स्पर्धेत सुमैर पवानी व क्रिश आनंद, आकाश ललवाणी व राहुल गुप्ता, ईशांत रेगे व अनुज मेहता यांचा उपांत्य फेरीत प्रवेश