पुणे, 4 नोव्हेंबर 2025: भारत पेट्रोलियम यांच्या तर्फे 44 व्या पीएसपीबी आंतर युनिट लॉन टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये भारतीय ऑलिम्पिकपटू रोहन बोपन्ना, सुमित नागल, अंकिता रैना, वैष्णवी आडकर, सहजा यमलापल्ली, श्रीवल्ली रश्मीका भामिदिप्ती, प्रार्थना ठोंबरे यांसह डेव्हिस कूपर युकी भांब्री, विष्णू वर्धन हे अव्वल भारतीय टेनिस पटूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. हि स्पर्धा डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट या ठिकाणी 5 ते 8 नोव्हेंबर 2025 या कालावधीत रंगणार आहे.
पत्रकारपरिषदेत अधिक माहिती देताना भारत पेट्रोलियमच्या क्रीडा विभागाचे मुख्य सर व्यवस्थापक दिपक जैन यांनी सांगितले की, स्पर्धेत 100 हुन अधिक खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला असून यामध्ये हे खेळाडू आयओसीएल, ओएनजीसी, एमएनजीएल, ओआयएल, एनआरएल, इआयएल, एचपीसीएल आणि आयोजक बीपीसीएल या संघांचे प्रतिनिधित्व करणार आहेत. तसेच, हि स्पर्धा पुरुष, महिला आणि प्रौढ गटांत होणार आहे. यावेळी पीएसपीबीच्या समितीच्या सदस्य सचिव समीरा चौधरी, आयटीएफ व्हाईट बॅच रेफ्री शिवा रेड्डी आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेत अव्वल भारतीय टेनिसपटू रोहन बोपन्ना, दिवीज शरण, सुमित नागल, प्रार्थना ठोंबरे, रिया भाटिया, रश्मी चक्रवर्ती हे खेळाडू इंडियन ऑईल कॉर्पोरेशन संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. ओएनजीसी संघात डेव्हिस कूपर युकी भांब्री, विष्णू वर्धन, व्हीएम रणजित यांचा तर, बीपीसीएलमध्ये जागतिक विद्यापीठ स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती वैष्णवी आडकर, फेड कप खेळाडू सहजा यमलापल्ली, श्रीवल्ली रश्मीका भामिदिप्ती, रिया सचदेवा, दोन वेळा प्रौढ गटात विजेतेपद पटकावणारे राज कुमार दुबे यांचा समावेश आहे.
स्पर्धेचे सामने आयटीएफ नियमानुसार खेळविण्यात येणार असून अव्वल भारतीय टेनिसपटूबरोबच आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय प्रमाणित ऑफिशियल्सचा देखील समावेश असणार आहे. स्पर्धेचे उदघाटन 5 नोव्हेंबर रोजी सकाळी 8.30 वाजता यांच्या हस्ते होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
भारतातील क्रीडा पटूंची गुणवत्ता जोपासण्यासाठी भारत पेट्रोलियम आणि अन्य ऑइल कंपन्यांनी दिलेले योगदान तसेच, आंतराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात सातत्याने होत असलेली चमकदार कामगिरी यामध्ये सुद्धा ऑइल कंपन्यांचे महत्वाचे योगदान असल्याचे जैन यांनी आवर्जून नमूद केले.
स्पर्धेतील सहभागी संघ खालीलप्रमाणेः
बीपीसीएलः महिला गटः वैष्णवी आडकर वैष्णवी आडकर, सहजा यमलापल्ली, श्रीवल्ली रश्मीका भामिदिप्ती, रिया सचदेवा ; प्रौढ गटः राज कुमार दुबे, पी.व्ही. रवितेज, एन. चंद्रशेखर, मुनेश शर्मा, जोसेफ अँथोनी कुंजूर, थॉमस जेम्स, खुसविंदर, मनीष शर्मा;
आयओसीएलः पुरुष गटः रोहन बोपन्ना, दिवीज शरण, सुमित नागल; महिला गटः प्रार्थना ठोंबरे, रिया भाटिया, रश्मी चक्रवर्ती; प्रौढ गटः पंकज कुमार गंगावर, सुभाष राजोरा, त्रिभुवन कुमार, मनोज पतीर;
एमएनजीएलः पुरुष गटः नीलभ नारायण;
ओएनजीसीः पुरुष गटः युकी भांब्री, विष्णू वर्धन, व्हीएम रणजितः प्रौढ गटः एस.के.पी. भंडारी, विजय पी.टी., अमिया सरकार, के.एस. रावत;
ओआयएलः पुरुष गटः उदित गोगई, शेख मोहम्मद इफितिखार, पार्थिव कलिता, रियान कश्यपः प्रौढ गटः दिगंता केआर बोरा, डॉ. सिद्धार्थ देवरी भराली, धृबा ज्योती हजारिका, मोहम्मद हकीम अली;
एनआरएलः पुरुष गटः सुबुल चंद्रा हलोई, सिद्धार्थ प्रतिम दत्ता, राहुल आनंद, रितुराज सैकिया; प्रौढ गटः जयंता कमल, बाभूळ ज्योती दास, कृष्णा कांता दत्ताः
इआयएलः पुरुष गटः एस बालाजी, एस त्रिपाठी, अक्षय कुमार, महेश कुमार; प्रौढ गटः रजनीश मलिक, आर के सिंग, अजय जैन, सौरभ अगरवाल;
एचपीसीएलः पुरुष गटः अरुण सिंग, जेसविन जी, बिष्णोई क्रिशन कुमार, संदीप कुमारः प्रौढ गटः देबाशिष चक्रवर्ती, भूपती मुरली कृष्णा, रशिम चावला, सत्यपाल, भीमनेनी श्रीकांत.

More Stories
आयएफएससी आशियाई किड्स चॅम्पियनशिप 2025: कोरियाचे 18 पदकांसह वर्चस्व, तर भारतीय खेळाडूंची सात पदकांसह दमदार कामगिरी
पहिल्या पुना क्लब व पीवायसी पिकल बॉल स्पर्धेत सुमैर पवानी व क्रिश आनंद, आकाश ललवाणी व राहुल गुप्ता, ईशांत रेगे व अनुज मेहता यांचा उपांत्य फेरीत प्रवेश
पहिल्या पुना क्लब व पीवायसी पिकल बॉल स्पर्धेत आकाश धलवाणी व राहुल गुप्ता, ईशांत रेगे व अनुज मेहता, संग्राम पाटील व कल्पक पत्की यांना विजेतेपद