पुणे, ४ नोव्हेंबर २०२५: लांब पल्ल्याच्या प्रवासावरून आलेल्या प्रवाशांसाठी आणि विमाननगर परिसरातील नागरिकांसाठी आधुनिक व स्वच्छतेच्या दृष्टीने आदर्श ठरणारे अत्याधुनिक वातानुकूलित स्मार्ट सार्वजनिक स्वच्छतागृह (दि. ४) फिनिक्स मॉललगत कार्यान्वित करण्यात आले. या प्री-फॅब्रिकेटेड एअर कंडिशन्ड स्मार्ट टॉयलेटचे उद्घाटन महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांच्या हस्ते झाले.
या प्रसंगी आमदार बापूसाहेब पठारे, घनकचरा विभाग प्रमुख संदीप कदम, कार्यकारी अभियंता अमर मदिकुंठ, प्रसाद जगताप आदी उपस्थित होते.
महापालिकेमार्फत उभारण्यात आलेले हे ४४४ चौरस फूट क्षेत्रफळाचे स्वच्छतागृह ७० टक्के भाग शौचालयासाठी व ३० टक्के भाग कॅफेसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. हे संपूर्ण स्वच्छतागृह वातानुकूलित असून स्वच्छता व सोयींच्या दृष्टीने शहरातील पहिल्या स्मार्ट स्वच्छतागृह संकल्पनांपैकी एक ठरणार आहे.
येथे पुरुषांसाठी पाच टॉयलेट्स व मुतारी, महिलांसाठी पाच टॉयलेट्स, तसेच बेबी फीडिंग व चेंजिंग रूम, तृतीयपंथीय आणि अपंग व्यक्तींकरिता स्वतंत्र शौचालये अशी व्यवस्था आहे. या उभारणीसाठी सुमारे ३३ लाख रुपये खर्च झाला असून, पुढील दहा वर्षांसाठी “परोसा प्रायव्हेट लिमिटेड” कंपनीला कॅफे चालवण्याचा अधिकार देण्यात आला आहे. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर स्वच्छता, देखभाल व दुरुस्ती केली जाणार आहे.

More Stories
पुणेकरांसाठी वाहतुकीचा दिलासा; हडपसर–सासवड मेट्रो मार्गांना मंजुरी
Pune: वीस दिवसांत तीन बळी, शेवटी नरभक्षक बिबट्याचा अंत!
Pune: पदवीधर-शिक्षक मतदार नोंदणीसाठी ६ नोव्हेंबरपर्यंत मुदत : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी