भोर, १० नोव्हेंबर २०२६: पुणे जिल्ह्यातील भोर येथील रामबाग रोडवर उपजिल्हा रुग्णालयासमोर भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला, तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला. अपघातानंतर ट्रकखाली अडकलेली दुचाकी सुमारे ३०० मीटरपर्यंत फरफटत नेण्यात आली. यावेळी लागलेल्या आगीत ट्रक आणि दुचाकी दोन्ही जळून खाक झाल्या.
या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव ओंकार टोळे असून, गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव विशाल लेखावळे आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रामबाग रोडवरील नवलाई मंदिरासमोर भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेनंतर ट्रक चालकाने वाहन न थांबवता पुढे नेले. यावेळी दुचाकी ट्रकखाली अडकल्याने ती सुमारे ३०० मीटरपर्यंत फरफटत गेली.
या घर्षणामुळे ट्रकने पेट घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यानंतर लागलेल्या आगीत ट्रकसह दुचाकीही पूर्णपणे जळून खाक झाली. या दुर्घटनेत दुचाकीवरील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला.
अपघातानंतर ट्रक चालक वाहन घटनास्थळी सोडून फरार झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

More Stories
लक्ष्मीपूजनानिमित्त ८ नोव्हेंबर रोजी पुणे मेट्रोची सेवा रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहणार
पुणे: मोहम्मदवाडीतील खासगी जागेवर कचरा टाकून जाळला जात असल्याचा आरोप; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
‘विद्यापीठ नव्हे, विद्यार्थ्यांचे दुसरे घर! सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ६०० विद्यार्थ्यांसोबत दिवाळीचा आनंदोत्सव’