पुणे, दि. ०९/०५/२०२३: दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांचा ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करावा, अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली आहे.
मुळीक म्हणाले, ‘हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असून वास्तव दाखविणारा आहे. केरळमधील हजार मुली अचानक गायब झाल्या. त्यानंतर त्यांचे धर्मांतर करून ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेत सामील केले गेले, असे या चित्रपटात दाखविण्यात आले आहे. या विषयाबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे. त्यासाठी हा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करावा ज्यामुळे तो अधिकाधिक नागरिकांना पाहाता येईल.’

More Stories
सूर महती महोत्सवात रसिकांनी अनुभविली गायन, वादन आणि नृत्यप्रस्तुतीची अनुभूती
नगरपरिषद व नगरपचांयतीच्या सार्वत्रिक निवडणूकीकरिता २ डिसेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
Pune: शहरात ३० नोव्हेंबर रोजी ‘नदी महोत्सव’ साजरा होणार