July 27, 2024

पुणे: घरफोडी करणार्‍या सराईतासह दोघांन अटक, २१ लाखांचा ऐवज जप्त

पुणे, दि. १०/०५/२०२३: घरफोडी करणार्‍या सराईतासह चोरीचे सोने नगरमधील सराफांना विक्री करणार्‍या दोघांना युनीट पाचने अटक केली आहे. त्यांच्याकडून २१ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. घोरपडीत बंगल्याचे नूतनीकरण सुरु असताना सराईताने ४० लाखांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना मार्च २०२३ मध्ये घडली होती.

मुकेश बबन मुने (वय २६ रा. सुतारदरा, कोथरुड) असे सराईताचे नाव आहे. नितीन सुरेश बागडे (वय ३२ रा. कवडे गल्ली, नालेगाव, नगर) यांना अटक केली आहे.

घोरपडी परिसरात बंगल्याचे नूतनीकरण सुरु असताना सराईताने ४० लाखांचा ऐवज चोरुन नेला होता. याप्रकरणी गुन्हे शाखेने शहरातील १०० पेक्षा जास्त सराईतांची तपासणी केली. त्यावेळी सराईत मुकेश मुने याने चोरी केल्याचे उघडकीस आले. त्याचा साथीदार नितीन बागडे दोघेही पुण्यातच असल्याचे निष्पन्न झाले. पथकाने खराडी बायपास परिसरातून त्यांना ताब्यात घेतले. सराईत मुकेशने चोरीची कबुली देत साथीदार नितीनने नगरमधील सराफाना दागिन्यांची विक्री केल्याचे सांगितले. पोलिसांनी नगरगधून ऐवजासह रोकड असा मिळून २१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदीप कर्णिक, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, एसीपी नारायण शिरगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.